Sanjay Raut Letter  Saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut Letter : 'नाशिकमध्ये ८०० कोटींचा घोटाळा, जनतेच्या पैशांची लूट'; संजय राऊतांचं थेट PM मोदींना पत्र

Sanjay Raut Letter News : 'या घोटाळ्यात मुख्यमंत्री व त्यांच्या मर्जीतले बिल्डर या ८०० कोटींचे लाभार्थी आहेत. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा सवाल करत संजय राऊत यांनी पत्र लिहिलं आहे.

Vishal Gangurde

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. संजय राऊत यांनी नाशिकमध्ये ८०० कोटींचा भूसंपादन घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. 'या घोटाळ्यात मुख्यमंत्री व त्यांच्या मर्जीतले बिल्डर या ८०० कोटींचे लाभार्थी आहेत. या प्रकरणी देवेंद्र फडणवीस त्यांच्यावर काय कारवाई करणार, असा सवाल करत संजय राऊत यांनी पत्र लिहिलं आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणााची चौकशी करण्याची मागणी केली आहे. संजय राऊत राऊत यांनी पत्र लिहित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशनाने नाशिक महापालिकेमार्फत खासगी वाटाघाटीद्वारे जमिनी ताब्यात घेऊन विकत घेण्याचे अनेक प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचा आरोप केला आहे.

'बिल्डरांचे आर्थिक हित डोळ्यांसमोर ठेवून सातशे कोटी रुपये जमिनींचा मोबदला म्हणून वाटप करून मोठा घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणात मुख्यमंत्री शिंदे हे चौकशी टाळून बिल्डरांना पाठीशी घालत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. या पालिकेच्या आयुक्तांनी स्वतःच्या मर्जीतील अधिकाऱ्यांची प्राधान्यक्रम समिती निर्माण केल्याचंही त्यांनी म्हटलं आहे

'बिल्डरांनी आर्थिक फायदा घेताना मुद्रांक शुल्क, आयकर, नजराणा मोठ्या प्रमाणात बुडवला. शासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान केले. अनेक जागांसाठी नियमबाह्यपणे कोट्यवधी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे. आरक्षित नसलेल्या जागांनाही रोख मोबदला देण्यात आला आहे. भूसंपादन प्रक्रिया राबवून शंभर कोटी रुपये ठरावीक बिल्डरांनाच देण्यात आले आहेत, यासाठीही तत्कालीन नगर विकास मंत्री व विद्यमान मुख्यमंत्री यांचेच आदेश होते. या दोन्ही प्रक्रियांमध्ये एकूण आठशे कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

नाशिकमधील घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे. या प्रकरणी कुठलीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली दिसत नाही. विधानसभेतही एका प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री शिंदे यांनी या प्रकरणास क्लीन चिट दिलेली आहे, असेही त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT