Lata Mangeshkar passes away  Saam Tv
मुंबई/पुणे

Lata Mangeshkar passes away: एक सूर्य..एक चंद्र..एकच लता..लतादीदींच्या निधनानंतर संजय राऊत यांचे ट्वीट

भारतरत्न आणि भारताच्या सूर सम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज मुंबईमध्ये निधन झालं आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : भारतरत्न आणि भारताच्या सूर सम्राज्ञी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं आज मुंबईमध्ये निधन झालं आहे. वयाच्या ९२ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. लता मंगेशकर यांच्या निधनामुळे संपूर्ण जगावर शोककळा पसरली आहे. आज रविवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. (Sanjay Raut tweet after Lata didi death)

हे देखील पहा-

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याविषयी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी एक सूर्य, एक चंद्र, एक लता, मंगेशकर.....युग संपले. असा उल्लेख करत लता दीदी यांच्या प्रकृतीविषयी बातमी दिली आहे. संजय राऊत यांनी ३ ट्विट करत लता दीदींच्या श्रद्धांजली वाहिली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता दीदींची भेट घेतली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याविषयी ट्विट केले आहे. त्यामध्ये त्यांनी एक सूर्य, एक चंद्र, एक लता, मंगेशकर.....युग संपले. असा उल्लेख करुन लता दीदी यांच्या निधनाविषयी बातमी दिली आहे.

संजय राऊत यांनी तीन व्टिट करुन लता दीदींच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात लता दीदींची भेट घेतली आहे.

Edited By- Digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Driverless Metro : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पहिल्यांदाच धावणार ड्रायव्हरलेस मेट्रो; मार्ग आणि स्थानके कोणती?

India Post Bonus : रेल्वेनंतर आता पोस्ट ऑफिस कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! ६० दिवसांच्या वेतनाइतका बोनस जाहीर

Relationship Tips : रागाच्या भरात या गोष्टी बोललात, तर नातं संपायला वेळ लागणार नाही

Same Food Side Effect: तुम्हीही रोज एकच नाश्ता किंवा जेवण करता का? वाचा काय घडते तुमच्या शरीरात!

Shocking : नूडल्स खाऊन झोपले, सकाळी उठलेच नाहीत, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं ?

SCROLL FOR NEXT