Sanjay Raut on Raj Thackeray, Sanjay Raut on Raj Thackeray's Sabha  Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut On Raj Thackeray: 'भाजपच्या पोपटांना बोलायला सांगा...'; संजय राऊतांचा नाव न घेता राज ठाकरेंना टोला

Sanjay Raut On Raj Thackeray: खारघर दुर्घटना प्रकरणावरून राऊतांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना नाव न घेता टोला लगावला आहे.

जयश्री मोरे

Sanjay Raut News: ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि मनसेवर टीकास्त्र सोडलं आहे. राज ठाकरे यांनी कोरोनाकाळातील नियोजनावरून उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. याच टीकेचा आधार घेत खारघर दुर्घटना प्रकरणावरून राऊतांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना नाव न घेता टोला लगावला आहे.

'भारतीय जनता पक्षाने एवढे पोपट पाळून ठेवलेले आहेत. त्यांना बोलू द्या, पोपटपंची करू द्या. गंगेमध्ये हजारांहून अधिक प्रेते वाहत गेली. नोटबंदी काळात रांगेत काही लोकांचा मृत्यू झाला. हा सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा आहे. त्याच्यावरती सुद्धा त्यांना बोलायला सांगा, भाजपच्या पोपटांना बोलायला सांगा, असा टोला राऊत यांनी लगवाला. (Latest Marathi News)

'ते जगाचे नेते आहेत. काय मागण्या करताय? कोणासाठी करताय? लोक तडफडून मेले आणि बाजूला मेजवानांना सुरू आहेत. त्या मेजवानीवर बोला. ढिसाळ आयोजनावर बोला, कशा करीता हा खारघरचा कार्यक्रम केला त्याच्यावरही बोला. 'उठ सूट उद्धव ठाकरे, झोपेत उद्धव ठाकरे आणि जागेपणी उद्धव ठाकरे, असा टोला राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला

खारघर प्रकरणावर भाष्य करताना म्हणाले, 'खारघर प्रकरणात मृतांचा आकडा ५ नंतर सात झाला, त्यानंतर नऊ झाला, त्यानंतर 11 झाला आणि आता तो आकडा १४ वर आला आहे. रुग्णालयात हे लोक जे अत्यावश्यक परिस्थितीत आपल्या घराकडे निघाले होते, ते आपल्या घराकडे पोहोचलेत की नाही त्यातील अनेकांची परिस्थिती गंभीर होती'.

'आमच्या मनात भीती आहे, त्यांचा आकडा 50 वर जाऊ शकतो. ही जर माझी भूमिका असेल तर भारतीय जनता पक्ष आणि मिंधे गटातील लोकांना यातना होण्याची गरज काय? हा आकडा आला त्याला जबाबदार कोण आहे? ढिसाळ कारभार कोणी केलं, लोकांना उन्हात ठेवलं. त्यांना पाणी का मिळालं नाही? अन्न का मिळालं नाही? त्यांची व्यवस्था काय होती? लोक 40 डिग्रीत उन्हामध्ये तडफडत होते, असा सवाल संजय राऊत यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पहलगाममध्ये क्रूर दहशतवादी हल्ला: राहुल गांधी

Government App : ओला-उबरला झटका, सरकार अॅप लाँच करणार, सरनाईकांची माहिती

Aamir Khan: आमिर खानकडून चाहत्यांना गिफ्ट, फक्त १०० रुपयांत पाहायला मिळणार सर्व चित्रपट; कुठे आणि कसं?

Smartphone Tips: फोन सतत हॅंग होतोय? वापरा 'या' सोप्या टिप्स

Shocking : ड्युटीवर असताना डॉक्टर झोपला, उपचाराअभावी अपघातग्रस्ताचा मृत्यू, Video मुळे सरकारी रुग्णालयातलं सत्य बाहेर

SCROLL FOR NEXT