- सचिन जाधव
Pune News : लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस (lifeline hospital management services) या फर्मला जंबो कोविड सेंटरच्या वैद्यकीय सेवा परिचलनासाठी निविदा प्रक्रियेत निवड होणेकरता बनावट पार्टनरशिप डिड तयार करून सदरची निविदा मंजूर करून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची फसवणूक केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (shivajinagar police station) सुजित पाटकर (sujeet patkar) यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटकर हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे व्यावसायिक भागिदार आहेत. हा गुन्हा भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या मागणीनंतर पाेलिसांनी दाखल केला आहे. (Breaking Marathi News)
राजू लक्ष्मण ठाणगे (कार्यकारी अभियंता, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) यांच्या फिर्यादीनंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे. भाजप नेते किरीट साेमय्या यांनी ट्विट करुन खासदार संजय राऊत यांचे पार्टनर सुजित पाटकर आणि अन्य भागीदार डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, संजय मदनराज शहा, राजू नंदकुमार साळुंखे यांचा विरोधात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याचे म्हटलं आहे.
पुणे शहर (FIR No. 80/2023 IPC Sections 420, 406, 465, 467, 468, 471, 511, 34) काल रात्री गुन्हा दाखल केल्याची माहिती साेमय्या यांनी दिली.
साेमय्या म्हणाले शिवाजीनगर पुणे जम्बो कोविड सेंटरचे कॉन्ट्रॅक्ट फसवणुकीने मिळविले, ३ कोवीड रुग्णाचे मृत्यू अनेक कोवीड रुग्णाचे कायमचे नुकसान संबंधात मी आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) यांनी याबाबत तक्रार केली हाेती. त्यानूसार गुन्हा दाखल झाला आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.