आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा प्रकरण सध्या चांगेलच चर्चेत आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोनवरून तंबी दिल्याचा एक व्हिडीओ समोर आला होता. या घटनेनंतर राजकारण चांगलेच तापले आहे. कर्तव्यावर असणाऱ्या महिला अधिकाऱ्याला धमकावल्याप्रकरणी आता अजित पवार यांच्यावर सडकून टीका होत आहे. अशामध्ये शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधत 'आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांचं चुकलं काय?', असा सवाल केला आहे.
संजय राऊत यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या प्रकरणावर बोलताना अजित पवारांवरच टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, 'जर मंत्री आणि राज्यकर्ते चुकत असतील तर नियम काय आहे? संविधान काय आहे? हे दाखवून देणं काम आहे. त्या महिला अधिकाऱ्याचं काय चुकलं? राज्याचे उपमुख्यमंत्री तिला बेकायदेशीर कामांना संरक्षण द्यायला सांगतात आणि त्या महिला अधिकारी असं डायरेक्ट सांगताहेत की तुम्ही माझ्या फोनवरती फोन करा. गुन्हेगाराच्या फोनवरती मी तुमच्याशी बोलणार नाही समजून घ्या. ज्या गुन्हेगारावरती मी कारवाई केली होती किंवा कारवाई करत आहे त्याच्या फोनवरती उपमुख्यमंत्री त्या महिला उपअधीक्षकाला धमकी देत आहेत आणि त्या महिला अधिकाऱ्याला सांगायचा आहे की तुम्हाला जे काय सांगायचं आहे ते थेट माझ्या फोनवरती फोन करून सांगा. यात काय चुकलं? पवारांना जे काही सांगायचे ते त्यांनी त्या महिला अधिकाऱ्याच्या फोनवरती फोन करून सांगायला पाहिजे.'
नियमबाह्य काम करत नाही असे म्हणणाऱ्या अजित पवारांवर बोलताना संजय राऊत म्हणाले की, 'सगळ्यात आधी महत्त्वाचा विषय इतकाच आहे. बेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना फोन केला. ज्याअर्थी बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या लोकांनी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना फोन केला ते त्यांचीच माणसं होती. ते कार्यकर्ते असू शकतात आणि बेकायदेशीर कामाला संरक्षण द्या हे सांगण्यासाठी फोन केला. अजित पवार नेहमी त्यांच्या भाषणामध्ये सांगत असतात मी कोणतेही नियमबाह्य काम करत नाही. नियामत जर बसत नसेल तर मी हो म्हणत नाही. त्यांचा अनेक गोष्टी आहेत. चुकीचं काम करणाऱ्या लोकांना टायर वरती उलट करून मारा. बारामतीच्या तिथे ते सगळं सांगत असतात. मुख्यमंत्री नियमात बसत नसेल. इतका मोठा अनुभवी माणूस सहा -सात वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले नेते त्यांना हे समजून आहे.'
हे सरकार गुंडांचे आहे असे म्हणत संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले की, 'पोलिसांनी त्यांच्या बेकायदेशीर कामांना संरक्षण द्यावं कारवाई करू नये म्हणून ते पोलिस अधिकाऱ्यांशी वाद घालत होते. याला तणाव म्हणत नाहीत दादागिरी म्हणतात. अशा गुंडांना सध्याचे सरकार मी अजित पवार म्हणत नाही तर जवळजवळ अर्धा मंत्रिमंडळ अशा कामांना संरक्षण देतात. अजित पवारांना यासंदर्भात गुन्हेगार आम्ही ठरवत नाही पण अजित पवारांनी उगाच नाकाने कांदे सोलू नये. ते जे बोलत असतात भाषणा करत असतात लोकांना ज्ञान देत असतात तुमचेही पाय मातीचेच आहे. ताबडतोब तुमच्या आमदाराने त्या पोलिसाची चौकशी करा.'
अमोल मिटकरी यांनी अंजना कृष्णा यांची चौकशी करावी अशी मागणी यूपीएससीकडे केली आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले की, 'त्याचं प्रमाणपत्र बघा मग आत्तापर्यंत तुम्हाला माहित नव्हतं ही परत दुसरी धमकी आहे. पहिले धमकी अजित पवारांनी दिली आणि दुसरी धमकी जर तुम्ही आमच्या नेत्याबद्दल काही बोलाल तर आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात काम करू देणार नाही. हे त्या आमदाराचं पत्र सांगतंय यूपीएससीला पत्र लिहितात त्या अधिकाऱ्याची चौकशी करा. का तर त्याने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना नियम आणि कायदा काय असतो हे सांगितलं जे की त्याचं काम आहे. आयएएस, आयपीएस ज्याला भारतीय प्रशासकीय सेवा म्हणतात त्यात काम करणाऱ्या प्रत्येकाचे हे काम आहे.
तसंच, 'नैतिकेचा मुद्दा असेल आणि महाराष्ट्रात नैतिकता पाळायची म्हटलं तर महाराष्ट्रातील ९० टक्के मंत्रिमंडळ खाली होईल. शिंदे गटाचे सगळे मंत्री घरी जातील. नैतिक त्याच्या मुद्द्यावर अजित पवारांचे सर्व घरी जातील प्रत्येकावर आरोप आणि गुन्हे आहेत.प्रत्येक जण आजही सरकारमध्ये बसून बेकायदेशीर काम करत आहे. कालची तर गोष्ट सोडून द्या. नैतिकेच्या मुद्द्यावर करायचं म्हटलं तर नीम मंत्रिमंडळ हे २४ तासांत घरी जायला पाहिजे.', असे संजय राऊत म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.