Siddhi Hande
पूजा सावंत ही मराठमोळी अभिनेत्री आहे. पूजा सावंत अभिनयासोबतच आपल्या हटके लूकने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
पूजा सावंत अनेकदा मराठमोळ्या लूकमध्ये फोटोशूट करत असते. पूजाचे दागिनेदेखील फार सुंदर असतात.
पूजा सावंतचे मोठं मंगळसूत्र तुम्हीही साडीवर घालू शकतात. हे मंगळसूत्र खूपच सुंदर आहे.
पूजा सावंतच्या सोन्याच्या मंगळसूत्राला पारंपारिक डिझाइन आहे. मंगळसूत्राला मध्येच सोन्याची डिझाइन आणि काळे मणी आहेत.
पूजा सावंतचे दोन वाट्या असलेले मंगळसूत्र काठपदर साडीवर उठून दिसेल. दोन वाटीच्या मंगळसूत्राची क्रेझ कधीच कमी होणार नाही.
पूजा सावंतचे डायमंडचे पेडंट असलेले मोठे मंगळसूत्रदेखील छान दिसते. एकदम सिंपल साडीवर हे मंगळसूत्र सूट होईल.
तुम्ही लहान आकाराने चैन मंगळसूत्रदेखील घालू शकतात. त्यामध्ये एकाच डायमंडची डिझाइन असेल.
काही मंगळसूत्रांमध्ये सोनं जास्त असतं तर काहींमध्ये काळे मणी. काळे मणी जास्त असलेले आणि ते सोन्याच्या चैनीत विणलेले मंगळसूत्र खूप छान वाटेल.