Siddhi Hande
अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच आपल्या अभिनयाने आणि स्वभावाने प्रेक्षकांनी मने जिंकत असते.
प्राजक्ता माळी महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात काम करत आहे. कार्यक्रमात तिचे अनेक मित्र- मैत्रिणी आहेत. त्यातील एक जवळची मैत्रिण म्हणजे नम्रता संभेराव.
नम्रता संभेराव आणि प्राजक्ता माळी अनेकदा एकत्र काम करताना दिसतात. त्यांचे फोटो, रिल्स व्हायरल होत असतात.
प्राजक्ता माळीने मैत्रिणीला खास गिफ्ट दिलं आहे. तिने आपल्या प्राजक्तराज ब्रँडचे खास शिंदेशाही तोडे तिला दिले आहेत.
प्राजक्ता माळीच्या दागिन्यांच्या ब्रँडला तीन वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त या दोघीही इन्स्टाग्रामवर लाइव्ह आल्या होत्या.
प्राजक्ताने आपल्या चाहत्यांचे आभार मानले. त्यांच्याशी गप्पा मारल्या. यावेळी नम्रतादेखील उपस्थित होती.
प्राजक्ताने आपल्या दागिन्यांमधील एक दागिना मैत्रिणीला दिला.याचाच फोटो नम्रताने शेअर केला आहे.
हे तोडे खूप मोठे आणि भरीव आहेत. या तोड्यांवर बारीक डिझाइन कोरलेली आहे.