Sakshi Sunil Jadhav
महिलांना आयब्रो करताना खूप वेदना होतात. त्यामुळे बऱ्याच महिला आयब्रो करायला घाबरतात. पण आता टेन्शन सोडा तुम्ही घरच्या घरी काही टिप्स वापरुन आयब्रो करु शकता.
तुम्हाला सुंदर आणि दाट आयब्रो हवे असतील तर पुढील सोप्या पद्धीतींचा वापर नक्की करा. त्याने तुम्ही सुंदर दिसाल आणि आयब्रो करताना तुम्हाला वेदनाही होणार नाहीत.
रात्री झोपण्याच्या आधी आयब्रोवर एरंडेल तेल लावल्याने केस मजबूत होतात आणि नॅचरली वाढतात. जेव्हा तुम्ही आयब्रो करता तेव्हा याने वेदनाही होत नाहीत. कारण याने तुमचे केस सॉफ्ट होतात.
अॅलोवेरा आयब्रोच्या त्वचेला थंडावा देतं. याने केसांना पोषण मिळतं. त्यामुळे आयब्रो करण्याआधी तुम्ही अॅलोवेरा जेलचा वापर आवर्जून करावा.
नारळ तेलाने आयब्रोची हलक्या हाताने मालिश करा. त्याने रक्ताभिसरण सुधारतं.
आठवड्यातून एका वेळेस तरी कांद्याचा रस आयब्रोला लावा. याने काहींना फरक जाणवतो तर काहींना जाणवत नाही. तुमच्या नुसार निवड करा.
दुधामुळे त्वचा मऊ होते आणि आयब्रोच्या भागात आराम मिळतो.
व्हिटॅमिन ई कॅप्सूल आयब्रोवर लावल्यावर केस गळती कमी होते. आयब्रो केल्यांनतर याचा वापर फायदेशीर ठरतो.