Sanjay Raut News  Saam TV
मुंबई/पुणे

भाजपनेच मेहबूबा मुफ्तींना बळ दिलं; संजय राऊतांचा घणाघात

मेहबूबा मुफ्ती आणि त्यांच्या पक्षाला ताकत देण्याचं काम भाजपने केला आहे. त्यामुळे या सगळ्याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आहे असा आरोप देखील राऊत यांनी यावेळी केला.

जयश्री मोरे

मुंबई - मेहबूबा मुक्ती (Mehbooba Mufti) यांच्यावर वरती भारतीय जनता पक्षाला काय वाटतं ते महत्त्वाचं आहे कारण मेहबूबा मुक्ती ही भारतीय जनता पक्षाचा एक भाग होता. मेहबूबा मुक्ती यांचा जो पक्ष आहे तो पहिल्यापासून फुटीरतावाद्यांना मदत करणारा पाकिस्तानला कश्मीरचा चर्चेत ओढणारा, अतिरेक्‍यांनी विषयी सहानुभूती दाखविणारा पक्ष होता असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. ते मुंबईत बोलत होते.

हे देखील पहा -

पुढे संजय राऊत म्हणाले की, तरीही या पक्षासोबत भाजपने युती करून सत्ता उपभोगली त्याच काळात कश्मिरी पंडितांवर हल्ले झाले त्याच काळात जे अतिरेकी लष्कराने मारले त्या अतिरेक्यांना मेहबूबा मुक्ती कडून स्वातंत्र्यसैनिक ठरवण्याचा प्रयत्न झाला तरी देखील भारतीय जनता पक्ष सरकार मधून बाहेर पडला नाही आणि आता काश्मीर फाईल बनवत आहेत अशी टोलेबाजी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. मेहबूबा मुफ्ती आणि त्यांच्या पक्षाला ताकत देण्याचं काम भाजपने केला आहे. त्यामुळे या सगळ्याला जबाबदार भारतीय जनता पक्ष आहे असा आरोप देखील राऊत यांनी यावेळी केला.

खासदार संजय राऊत पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 24 पैकी 22 तास काम करतात, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. आता त्यांना फक्त दोन तास झोप मिळते आता मोदी यांना ती 2 तासांची झोप मिळू नये म्हणून संशोधन सुरू आहे. हे ऐकूण पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही झोप उडेल. बाकी कोणीच काम करत नाही. बायडेन, झेलन्स्की, पुतिन. सारे बिनकामाचे आहेत. मालिक तो महान है, बस चमचों से परेशान है, असा टोलाही त्यांनी यावेळी चंद्रकांत पाटील यांना लगावला. चमचेगिरी तर सगळीकडेच होते पण असे चमचे आम्ही पाहिले नाहीत, असे देखील ते यावेळी म्हणाले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Shaping Tips : जिमला न जाता घरीच बनवा बॉडी, या 5 गोष्टी 15 दिवस करा फॉलो

Maharashtra Politics: ठाकरे बंधुंच्या युतीनंतर भाजपची मोठी खेळी, बालेकिल्ल्यात शिवसेनेला पाडलं भगदाड; ३ दिग्गज नेते गळाला

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Krishnaraaj Mahadik: महाडिकांची तिसरी पिढी राजकारणात; कृष्णराज महाडिक महापालिका निवडणूक लढवणार

Christmas Menu : ख्रिसमस पार्टी घरीच करताय? 'हा' पदार्थ जेवणात असायलाच हवा, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT