Sanjay Raut Reaction After Electioin Result Saam TV
मुंबई/पुणे

Election Results: शिवसेनेपेक्षा मोठा पराभव भाजपचा- संजय राऊत

"मायावती, असदुद्दीन ओवेसी यांना पद्मविभूषण, भारतरत्न द्यावं"

जयश्री मोरे

जयश्री मोरे

मुंबई : काल झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निडवणुकांचा निकाल लागला. पंजाब सोडून इतर 4 राज्यांमध्ये भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. तर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने काँग्रेस आणि भाजपाचा मोठा पराभव केला आहे. दुसरीकडे शिवसेनेला उत्तर प्रदेश आणि गोव्यात यश मिळाले नाही. त्यामुळे भाजपा नेते आता त्यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. त्यांच्या या टीकेला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. ते मुंबईत बोलत होते.

राऊत म्हणाले, "भारतीय जनता पार्टीला मोठा विजय मिळाला आहे. उत्तरप्रदेश त्यांचाच राज्य होते. तरीदेखील अखिलेश यादव यांची अधिक सीट मिळाले आहेत. 42 वरून 125 झाले आहेत म्हणजेच तीन पटीने वाढले आहेत. भाजपच्या विजयामध्ये मायावतीचे योगदान हे देखील मान्य करावे लागेल. ओवेसी यांचे पण आहे. त्यामुळे त्यांना आता पद्मविभूषण आणि भारतरत्न द्यावे लागेल."

"आम्ही खुश आहोत, पार्लमेंटची डेमोक्रॉसी आहे. हार जीत होत असते. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा मध्ये भाजप जिंकला आहे. आम्हाला दुःख होण्याचे काही कारण नाही. तुमच्या खुशीत आम्ही देखील सहभागी आहोत."

पंजाबमध्ये तुमचा पराभव हा चिंतेचा विषय;

उत्तराखंडचे मुख्यमंत्री का हरले ? गोवा मध्ये दोन दोन डेप्युटी सीएम का हरले ? सर्वात मोठ्या चिंतेचा विषय हा आहे की, पंजाब. पंजाबमध्ये मध्ये भारतीय जनता पार्टी ही एक राष्ट्रीय पार्टी आहे. प्रखर राष्ट्रवादी पार्टी आहे. पंजाबसारख्या सीमावर्ती राज्यात भारतीय जनता पार्टीला तेथील लोकांनी मतदान पूर्णपणे नाकारलं आहे. हा चिंतेचा विषय आहे. प्रधानमंत्री, राखमंत्री सर्वांनी तिथे प्रचार केला होता. तरीदेखील तुम्ही का हरले? उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा तुमचंच होत. उत्तरप्रदेशमध्ये तुम्ही आम्हाला विचारता ना तुम्हाला किती सीट मिळाले? शिवसेना आणि काँग्रेसची हार झाली, पण त्यापेक्षा वाईट पराभव तुमचा पंजाबमध्ये झाला आहे. याबद्दल तुम्ही देशाला मार्गदर्शन करा.

तुम्ही अजून काय करणार ? आणखी खोटे गुन्हे दाखल करणार?;

"यूपी तो सिर्फ झाकी महाराष्ट्र बाकी है" अश्या प्रकारच्या भाजप नेत्याच्या घोषेणाबद्दल विचारले असता, राऊत म्हणाले, पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी देखील अशा प्रकारच्या घोषणा केल्या जात होत्या. पवार साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही तयार आहोत. अजून काय करणार आहात? अजून रेड टाकणारा हात आणखी खोटे गुन्हे दाखल करणार? अजून काय करू शकतात? झाकी आणि बाकी आम्हाला माहित आहे आम्ही पण तयार आहोत.

हे देखील पहा-

...तर सत्य ऐकण्याची पण तयारी ठेवा;

केंद्रीय तपास यंत्रणेबद्दल राऊत म्हणाले, "चुकीच्या पद्धतीने केंद्रीय तपास यंत्रणा काम करत आहेत. एकाच पक्षाचे एकाच आघाडीचे लोकं टारगेट केले जात आहेत. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यावर आपण मत व्यक्त केलं पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणा राजकीय दबाव खालीच काम करत आहेत. यावर महाविकास आघाडी ठाम आहे. मी जरी तिथे बोललो आणि दहा मिनिटांनी घरावर माझ्या रेड पडली तरी मी घाबरत नाही. सत्य सांगणे हा दबाव आहे का ? तर मग सत्य ऐकण्याची देखील तयारी ठेवा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुबार मतदार आढळला तर जागेवर फोडून काढा, मनसे- शिवसैनिकांना राज ठाकरेंचा आदेश|VIDEO

Raj Thackeray: शिवाजीपार्कमधील सभेत राज ठाकरेंनी का व्यक्त केली दिलगीरी, नेमकं काय घडलं?

एमआयएम-काँग्रेस युती, ड्रग्स ते बदलापूर बलात्कार प्रकरणाचा आरोपी नगरसेवक, राज ठाकरेंनी भाजपचे कपडेच फाडले|VIDEO

Raj Thackeray: राज ठाकरेंनी अदानींचा दाखवला 'तो' व्हिडिओ; Video पाहताच अख्खा महाराष्ट्र हादरला

Mumbai Politics: शिवाजी पार्कवर सभा, दुसरीकडे निष्ठावंत शिलेदाराचा भाजपात प्रवेश; राज ठाकरेंना मोठा धक्का

SCROLL FOR NEXT