...म्हणून त्यांनी नव्याने गुन्हा दाखल केला; आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी राऊतांची पहिली प्रतिक्रिया Saam Tv
मुंबई/पुणे

'...म्हणून त्यांनी नव्याने गुन्हा दाखल केला'; आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी राऊतांची पहिली प्रतिक्रिया

संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

जयश्री मोरे

जयश्री मोरे

नवी दिल्ली : शिवसेना नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) रविवारी ता. १२ डिसेंबर २०२१ रोजी एफआयआर नोंदवण्यात आला होता. संजय राऊत यांनी दोन खासगी TV चॅनेलवर दिलेल्या मुलाखतींमध्ये भाजप कार्यकर्त्यांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. यावर संजय राऊत यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

हे देखील पहा-

मी जो शब्द वापरला आहे त्याचा अर्थ...;

याबद्दल संजय राऊत म्हणाले, दिल्ली मधल्या एका पोलीस ठाण्यांमध्ये माझ्या विरोधात तक्रार नाहीतर गुन्हा दाखल झाला आहे. मी जो शब्द वापरला आहे त्याचा अर्थ मूर्ख असा आहे, देशाच्या सर्व शब्दकोशांमध्ये त्याचा अर्थ दिलेला आहे. त्या शब्दकोशांना सरकारची सुद्धा मान्यता आहे. मोठ्या मोठ्या लोकांनी त्या शब्दावर आपले मत व्यक्त केले आहे. पुढे ते म्हणाले दिल्लीत माझ्याविरुद्ध एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. कुणाला मूर्ख म्हणंण, अशिक्षित अडाणी म्हणणं हे वारंवार आपल्या राजकारणात आपण शब्द वापरतो. मी तो शब्द वापरला तो शब्द या देशातला नाही तर जगातल्या कुठल्याही डिक्शनरी मध्ये त्याचा अर्थ पाहिला तर मूर्ख, बुद्धू असा दिलेला आहे. जर या शब्दाबाबत गुन्हे दाखल व्हायला लागले तर या देशात कायद्याचे राज्य राहिलेलं नाही. सूडाच्या भावनेने माझा आवाज दाबण्यासाठी हे केले आहे. माझ्याकडे सीबीआय इन्कम टॅक्स एमसीबी यांना सरकार पाठवू शकलं नाही म्हणून त्यांनी नव्याने हा एक गुन्हा दाखल केला आहे, असं संजय राऊत यावेळी म्हणले.

पुढे त्यांनी म्हंटल, "पार्लमेंट सुरू असताना एखाद्या खासदारावर असे गुन्हे दाखल करण्याचे धाडस त्यांनी दाखवलं आहे माझ्या त्यांना शुभेच्छा आहे. तर, मला त्रास देण्यासाठी आणि माझ्या पक्षाची बदनामी करण्यासाठी ही तक्रार करण्यात आली आहे,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

“सरकारी यंत्रंणा माझ्यावर बोट उचलू शकत नाहीत, म्हणून अशाप्रकारे तक्रारी करुन ज्याबद्दल गुन्हा दाखलच होऊ शकत नाही त्यासाठी कोणाला तरी पुढे करुन तक्रार केली जात आहे. मलाही सांगायचे आहे की ही शिवसेना आहे,” असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.

पुढे राऊत म्हणले, “इथे आमच्या महिलांनी त्यांच्या नेत्या विरोधात तक्रार केली आहे. तर त्यांनी तिथे त्यांनी माझ्या विरोधात तक्रार केली आहे, असे चालत नाही. तुम्ही संविधानाबद्दल बोलता आणि संसदेचे अधिवेशन चालू असताना खासदाराविरोधात खोटा गुन्हा नोंदवण्यासाठी प्रोत्साहन देता हे ठीक नाही,” असेही संजय राऊत यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs: आजचा ग्रहयोग काय सांगतो? सोमवार चार राशींना देणार दिलासा

Prajakta Shukre: बिग बॉसच्या घरात इंडियन आयडल फेम प्राजक्ता शुक्रेची एन्ट्री; गायिकेच्या येण्याने 15 वर्षांपूर्वीच्या वाद चर्चेत

Nitesh Rane: नितेश राणेंच्या घराबाहेर घातपाताचा प्रयत्न?'सुवर्णगडा'वर नेमकं काय घडलं?

Bigg Boss 6: दिपाली सय्यद ते राकेश बापट; कोण-कोण आहे 'बिग बॉस मराठी 6'मध्ये? वाचा सविस्तर यादी

Uddhav Thackeray: भाजपचा मुंबईला परत बॉम्बे करायचा डाव; शिवाजी पार्कातील सभेत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT