Sanjay Raut Latest News saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut : नेहरू नसते तर भारताचा पाकिस्तान झाला असता; सावरकरांच्या नातवाला राऊतांचं प्रत्युत्तर

कोणी सावरकरांवर प्रश निर्माण केले म्हणून पंडित नेहरू यांच्यावर प्रश्न निर्माण करायचे, हे निदान स्वत:ला सावरकरांचे वंशज समजणाऱ्यांनी तरी थांबवायला पाहिजे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रे दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. त्यातच आता स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर केलेल्या टीकेवर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रया दिली आहे. नेहरू नसते तर भारताचा पाकिस्तान झाला असता असे राऊतांनी म्हंटल आहे.

कोणी सावरकरांवर प्रश निर्माण केले म्हणून पंडित नेहरू यांच्यावर प्रश्न निर्माण करायचे, हे निदान स्वत:ला सावरकरांचे वंशज समजणाऱ्यांनी तरी थांबवायला पाहिजे. आमच्यासाठी सावरकरांसह, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू हे सगळे नेते प्रिय आहेत असे देखील राऊत म्हणाले.

हा देश विकासाच्या वाटेवर नेण्यात आणि विज्ञानाच्या दिशेने नेण्यात नेहरूंचं खूप मोठं योगदान आहे. जर सावकर विज्ञाननिष्ठ होते, असं आपण म्हणतो तर त्या विज्ञाननिष्ठेच्या दिशने देशाला नेण्याचं काम हे पंडित जव्हारलाल नेहरू यांनी केलेलं आहे. अन्यथा या देशाचा पाकिस्तान व्हायला वेळ लागला नसता अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी यावेळी दिली.

काय म्हणाले होते राहुल गांधी?

अकोला जिल्ह्यात राहुल गांधींनी भाषण दिलं. यावेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले होते की, सावरकर हे भाजप-आरएसएसचे प्रतीक आहेत. ते दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले. त्यांनी दयेचे अर्ज लिहायला सुरुवात केली. राहुल गांधींनी असा दावा केला होता की, सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वतःवर एक पुस्तक लिहिले आणि ते किती शूर होते हे सांगितले. ते म्हणाले, "ते इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे, त्यांच्यासाठी काम करायचे आणि काँग्रेसच्या विरोधात काम करायचे." असं वक्तव्य केल्यामुळे राहुल गांधींवर टीका होतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: अजित पवारांच्या निवासस्थानी मोठा जल्लोष

Eknath Shinde: महायुतीच्या विजयानंतर एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया; शिंदेंनी मानले मतदारांचे आभार

Jasprit Bumrah: ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव? बुमराहवर फेकी बॉलिंगचे आरोप! सोशल मीडियावर पेटला वाद

Vidhan Sabha Election Result : खडसेंना धक्का; शिंदे शिवसेनेची जागा कायम

Radhakrushna Vikhe Patil : जनतेने महायुतीच्या धोरणावर शिक्कामोर्तब केलंय, विखे पाटलांची मोठी प्रतिक्रिया, पाहा Video

SCROLL FOR NEXT