Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut : शिवसेना स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही; संजय राऊतांचा इशारा कुणाला? VIDEO

Sanjay Raut Latest News : देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याची माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली. यावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. यावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.

Vishal Gangurde

गिरीश कांबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजपने पहिली यादी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी अद्याप उमेदवार जाहीर केले. याचदरम्यान, महाविकास आघाडीत ठिणगी पडल्याची चर्चा आहे. मात्र, महाविकास आघाडीतील नेत्यांनी आघाडीत नेत्यांनी ठिणगी पडल्याचे वृत्त फेटाळले आहे. यानंतर सुरु झालेल्या विविध चर्चांवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. 'शिवसेना स्वाभिमानाशी तडजोड करणार नसल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या राजकीय घडामोडीवर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, 'आम्ही मोठा संघर्ष केलाय. त्यांनी आमचा पक्ष फोडला, चिन्ह घेतलं. आमच्यावर संशय घेणारे एका बापाची औलाद नाहीत. मग ते कोणत्याही पक्षाचे असोत. त्यांनी बाप दाखवावा नाहीतर श्राद्ध घालावं. स्वार्थासाठी आमच्या स्वाभिमानवर शिंतोडे उडवणारे हे लोक आहेत. आमच्याशी समोर येऊन लढा. अशा बातम्या पसरवून कोणी लढणार असेल ना, तर त्यांना या महाराष्ट्रात राजकारण करण्याचा अधिकार नाही'.

'कोणीही पसरवल्या असतील. बातम्या दिल्या असतील. आमचीही यंत्रणा आहे. ही बातमी कोणी दिली, याची माहीती आमच्याकडे आली आहे.आमच्याकडे वेगळं पेगासिस आहे. शिवसेना महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी तडजोड करणार नाही. त्यांच्याशी हात मिळवणे म्हणजे औरंगजेबशी हात मिळवणे. आमच्यावर दडपण येत नाही. आमचं मन साफ आहे, असे संजय राऊत पुढे म्हणाले.

'आम्ही जे करतो, ते छातीठोकपणे करतो. आमची २१० जागांवर चर्चा झालीय. या जागांचा मार्ग मोकळा झालाय. २१० हा आकडा मोठा आहे. आमची भूमिका एकत्र राहण्याची आहे. शत्रूंना हरवण्यासाठी महाराष्ट्रात एकत्र लढू, असेही राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sindkheda Exit Poll: पवारांचा करिष्मा चालणार का? सिंदखेडाची जनता कोणाला निवडणार? पाहा Exit Poll

Exit Poll : धीरज देशमुख पुन्हा आमदार होणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?

Maharashtra Exit Poll: धामणगाव मतदारसंघातून विरेंद्र जगताप होणार आमदार? पाहा Exit Poll

Nevasa Exit Poll: नेवासा मतदारसंघात कोण होणार आमदार? Exit पोलचा अंदाज काय

Exit Poll Maharashtra : राहुरी विधानसभा मतदारसंघातून प्राजक्त तनपुरे होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT