Sanjay Raut - Amit Shaha Latest News : संजय राऊत अमित शहांच्या संपर्कात? कॉंग्रेसच्या सूत्रांकडून मोठा गौप्यस्फोट

Thackrey Group Dispute In Assembly Elections : विधानसभा निवडणुकीत एकीकडे ठाकरे गट 288 जागा स्वबळावर लढण्याची चर्चा होत असतानाच आता संजय राऊत हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या संपर्कात असल्याचं कॉंग्रेसच्या सूत्रांनी म्हंटलं आहे.

संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली असल्याची धक्कादायक माहिती कॉंग्रेसच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना सध्या वेग आला आहे. त्यातच महाविकास आघाडीत ठाकरे गटाचा आणि कॉंग्रेसचा जागावाटपावरून वाद विकोपाला गेलेला असताना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली असल्याची मोठी माहिती कॉंग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महाविकास आघाडीत सुरू असलेलं वादंग थांबत नसल्याने कॉंग्रेस आणि ठाकरे गटातील वाद सध्या चव्हाट्यावर आला आहे. त्यातच एकीकडे उद्धव ठाकरे शिवसेना गट आता 288 जागा स्वबळावर लढणार असल्याचं बोललं जात असतानाच दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असल्याचं कॉंग्रेसच्या सूत्रांनी सांगितलं आहे. या बंद दाराआडच्या चर्चांमुळे कॉंग्रेसमध्ये नाराजी दिसत आहे. ठाकरे गटाच्या या भूमिकेबाबत कॉंग्रेसला काल दुपारीच अंदाज आला होता. संजय राऊत यांनी काल बोलताना ज्या पद्धतीने नरमाईची भूमिका दाखवली होती, त्यानंतर कॉंग्रेसला या चर्चेचा संशय आला असल्याची माहिती कॉंग्रेसच्या सूत्रांनी दिली आहे. ठाकरे गट आणि अमित शहा यांच्यात फोनवरून झालेल्या चर्चेत राज्यात बिहारचा फॉर्म्युला कसा लागी करता येईल याबाबत बातचीत झाली आहे. त्यामुळे टोकाचे विरोधीपक्ष आता विधानसभेत एकत्र येतील का? याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहे.

Edited By Rakhi Rajput

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com