Sanjay Raut Saam Tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut Press Conference: आमचं सरकार आणायला मदत करा, अन्यथा केंद्रीय यंत्रणा तुम्हाला टाईट करेल, संजय राऊतांचा भाजपच्या नेत्यांवर गंभीर आरोप

आम्हाला हे सरकार पाडायला आणि आमचं सरकार आणायला मदत केली नाही तर केंद्रीय यंत्रणा तुम्हाला टाईट करेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: आम्हाला हे सरकार पाडायला आणि आमचं सरकार आणायला मदत केली नाही तर केंद्रीय यंत्रणा तुम्हाला टाईट करेल, फिक्स करेल, असं मला भाजपच्या नेत्यांनी सांगितलं असा गंभीर आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे आता एक नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे (Sanjay Raut Says BJP leaders threatened him and other shivsena leaders over CBI).

संजय राऊतांची पत्रकार परिषद

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. दोन दिवसांपूर्वी त्यांनी असंच एक वक्तव्य केलं होतं ज्याने संपूर्ण राजकारणात भूकंप आला. भाजपचे 'साडे तीन' नेते तुरुंगात जाणार, असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारणात एकच खळबळ उडाली.

संजय राऊतांनी सांगितलेले ते नेते नेमके कोण असतील असा प्रश्न सर्वांना पडला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा करण्याचं सांगितलं होतं.

काय म्हणाले संजय राऊत?

गेल्या काही दिवसांपासून आपण पाहाताय, शिवसेना असेल, ठाकरे परिवार असेल, आनंदराव अडसूळ, शिवसेनेतील प्रमुख नेते, अनिल परब, भावना गवळी, पवारांचे कुटुंबीय या सर्वांवर केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने हल्ले करत आङेत. मला असं वाटतं हे महाराष्ट्रावरील नाही तर देशावरील संकट आहे. असंच संकट पश्चिम बंगालवरही आहे. तिकडे राज्यपालांनी विधानसभा स्थगित करुन टाकली.

महाराष्ट्रातील सरकारही त्यांना पाडायचं आहे. त्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. खोटे आरोप, बदनाम्या, केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव. एकतर तुम्ही सरेंडर व्हा, गुडघे टेका नाहीतर सरकार आम्ही घालवू अशा प्रकारच्या धमक्या सतत दिल्या जात आहेत.

भाजपचे प्रमुख नेते रोज तारखा का देत आहेत. राज्यात 170 चं बहुमत असताना भाजपचे लोकदोन दिवसांनी एक तारीख देतात, हे तुम्ही कोणाच्या भरवशावर देत आहात. व्यंकय्या नाय़डू यांना मी एक पत्र लिहिलं आहे त्या पत्रापासून ही सुरुवात झाली आहे. केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात काय करत आहेत आणि माझ्यासारख्या राज्यसभा सदस्याला कशाप्रकारे त्रास देऊ पाहाताहेत याचं कारण इतकंच आहे.

साधारण 20 दिवसांपूर्वी भाजपचे काही प्रमुख लोक मला भेटले. तीन वेळा भेटले. त्यांनी वारंवार मला हे सांगण्याचा प्रयत्न केला की तुम्ही या सरकाच्या प्रवाहातून बाहेर पडा. कोणत्याही परिस्थितीत आम्हाला सरकार घालवायचं आहे. आमची संपूर्ण तयारी झाली आहे. एकतर राष्ट्रपती राजवट आणू, नाहीतर काही आमदार आम्ही तोडू तुम्ही मधे पडू नका. तुम्ही आम्हाला आमचं सरकार येण्यासाठी मदत करा, जर तुम्ही काही लोकांनी आम्हाला मदत केली नाही तर तुम्हाला केंद्रीय यंत्रणा टाईट करतील, फिक्स करतील. त्यासाठी दिल्लीतून सर्व सोय झाली आहे, असा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठापणाला

SCROLL FOR NEXT