Sanjay Raut Press Conference: त्यांना आधी बोलू दे, मग मी भाष्य करेन- चंद्रकांत पाटील

"त्यांच्या मनात, डोक्यात काय आहे हे मी कस सांगू?"
Sanjay Raut and Chandrakant Patil
Sanjay Raut and Chandrakant PatilSaam Tv
Published On

अश्विनी जाधव केदारी

पुणे : शिवसेना आणि भाजप यांच्यातला संघर्ष गेल्या अनेक दिवसांपासून वाढला आहे. भाजपचे केंद्रातील सरकार हे तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे असा आरोप शिवसेनेने केला आहे. याबाबत शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याचं कालच जाहिर केलं होतं. त्यामुळे शिवसेना आज कोणकोणते राजकीय गौप्यस्फोट करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यावर भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यांच्या मनात काय आहे हे मी कस सांगू, त्यांचं होउदे मग मी बोलेन अशी प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांचं होउदे मग मी बोलेन;

संजय राऊत हे काय बोलतील हे त्यांनाच विचारलं पाहिजे. त्यांच्या मनात काय आहे हे मी कस सांगणार ? त्यांचं बोलून झाल्यावर मी प्रतिक्रिया देईन. यावर भाजपचे साडे तीन नेते हे जेल मध्ये जातील तसे ते साडे तीन नेते कोण असतील यावर प्रश्न विचारला असता, चंद्रकांत पाटील म्हणाले, त्यांच्या मनात काय आहे डोक्यात काय आहे हे मी कस सांगू शकणार? मी आता दिल्लीला चाललोय त्यामुळे जेव्हा ते पत्रकार परिषद घेतील तेव्हा मी दिल्ली मधून सांगेन असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Sanjay Raut and Chandrakant Patil
India Corona Update: देशातील कोरोना रुग्णसंख्येत 19.6 टक्क्यांची घट; 27,409 नवीन रुग्णांची नोंद

पुढे ते म्हणाले, संजय राऊत यांचं बोलणं हे महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही आहे. ते बोलतील तेव्हा बघूया संजय राऊत हे मुंबई स्वतःची मानतात महाराष्ट्र स्वतःची मानतात. प्रत्येकाला बोलण्याचे, दावा करण्याचे स्वातंत्र्य आहे. सर्वसामान्य माणसावर अधिकार गाजवायला यांनी कधी पासूनच सुरु केलंय पण, यावर काहीतरी म्हणून वातावरण घडवू करण्याचे काही कारण नाही. त्यांना चार वाजता बोलू देत. त्याच्या मधलं काही बोलण्यासारखं असेल तर मी दिल्लीत यावर बोलेन, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

हे देखील पहा-

विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत शिवसेनेच्या खासदारांसह अनेक नेत्यांना या पत्रकार परिषदेत सहभागी होण्याचे आदेश शिवसेनेकडून देण्यात आले आहेत. पत्रकार परिषदेपुर्वी राऊतांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत “सौ सोनार की एक लोहार की” असं म्हणत सूचक इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com