Sanjay Raut News  Saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut News : संजय राऊतांच्या घरावर कोणाची नजर? दुचाकीवरील अज्ञात कोण? पाहा स्पेशल रिपोर्ट

Sanjay Ruat Latest News : संजय राऊत यांच्या घराची एकाने रेकी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर राऊत यांच्या सुरक्षेततेचा प्रश्न निर्माण झालाय. यावर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

Tanmay Tillu

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांच्या घराची रेकी करण्यात आली आहे. दहा मोबाईल कॅमेरे लावून शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास ही रेकी करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. या प्रकरणानंतर खळबळ उडाली आहे. त्यामुळे राऊतांवर कोण पाळत ठेवतंय कोण रेकी करतंय...पाहूया...

राऊतांचं घर, कोणाची नजर?

खासदार संजय राऊतांच्या घराची रेकी

राऊतांच्या घरावर कोणाची नजर?

10 कॅमेरे आणि दुचाकीवरील अज्ञात कोण?

कधी वाचाळवीर तर कधी सकाळचा भोंगा,तर कधी विश्वप्रवक्ते तर कधी कोण संजय राऊत? अशा बिरुदावल्यांनी विरोधकांच्या टार्गेटवर असलेले शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते...मात्र संजय राऊतांच्या भांडूपमधील घराची रेकी करण्यात आलीये. दहा मोबाईल कॅमेरे लावून ही रेकी करण्यात आल्याचा प्रकार उघड झालाय. या प्रकरणानंतर खळबळ माजली. त्यामुळे आपल्या रोखठोक वक्तव्यांनी सत्ताधाऱ्यांना शिंगावर घेणाऱ्या राऊतांच्या घरावर कुणाची नजर आहे असा सवाल उपस्थित झालायं...याप्रकरणी राऊत बंधूंनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहुयात.

यासंदर्भात विधिमंडळातही प्रश्न उपस्थित करण्यात आला..तर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन राऊतांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केलीय. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केलाय.

महाविकास आघाडी सरकार असताना संजय राऊत यांना वाय प्लस सुरक्षा होती. त्यानंतर महायुती सरकार आल्यावर ही सुरक्षा काढून घेतली. आता संजय राऊत यांना साधी सुरक्षा आहे. त्यात राऊतांच्या घराची, सामना कार्यालयाची आणि दिल्लीतील घराची रेकी झाल्याचा दावा राऊतांनी केलाय. त्यामुळे राऊतांवर नेमकी कोण पाळत ठेवतंय यावरून आता राजकारण तापण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange : लेकराला पुन्हा उपोषण करायला लावू नका, जरांगेंच्या मातोश्रींना अश्रू अनावर, सरकारला कळकळीची विनंती

Ashtavinayak Yatra : अष्टविनायका तुझा महिमा कसा...; गणपतीत करा अष्टविनायक यात्रा

Nashik News : नाशिकमध्ये धक्कादायक घटना, तब्बल ६,१२५ जिलेटीन अन् २२०० डेटोनेटर कांड्या जप्त

Ganesh Utsav 2025: गणेशोत्सवात बुधवारी गपणतीला 'या' गोष्टी करा अर्पण; बाप्पांचा आशिर्वाद सदैव राहील

Param Sundari Collection : सिद्धार्थ-जान्हवीच्या 'परम सुंदरी' ची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी; ७ चित्रपटांना टाकले मागे, कलेक्शनचा आकडा किती?

SCROLL FOR NEXT