Sanjay Raut: 'मराठी माणसाला कमजोर करण्याचा भाजपचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी' संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut on BJP: राज ठाकरे यांनी देखील कल्याणच्या मराठी माणसाच्या हल्ल्यावर भूमिका मांडली नाही. ते भारतीय जनता पक्षासोबत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.
Sanjay Raut on BJP
Sanjay Raut on BJPSaam tv
Published On

Maharashtra Politics: कल्याणमधील मराठी कुटुंबावर परप्रांतीय असलेल्या सरकारी अधिकाऱ्यानं हल्ला केला. ज्यामुळे राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय. मराठी माणसांवरील हल्ल्यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केलीय. तसेच मराठी माणसाला नष्ट करण्याची भाजपची भूमिका आहे. या सर्वांना मराठी म्हणवून घेण्याची लाज वाटली पाहिजे. असा घणाघातही त्यांनी केला.

नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांनी मराठी संघटानेला फोडलं. ते मराठी माणसाला कमजोर करत आहेत. मराठी माणसाला दुय्यम दर्जाची वागणूक मिळावी, त्यांच्यातली लढण्याची ताकद नष्ट व्हावी. मुंबई आणि आजूबाजूचा परिसर हा अदानी, लोढा इतर गुंडे आणि मराठी बिल्डरच्या घशात घालण्यासाठी भाजप मराठी माणसाला कमजोर करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. विधानसभा निवडणुका झाल्यानंतर मराठी माणसाचा खून होतोय, असाही आरोपही त्यांनी केला.

नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी ज्यांच्या हाती शिवसेनेचं चिन्ह दिलं. ते नामर्द लोक आहेत. त्यांना कल्याणमध्ये घडलेल्या घटनेची वेदना टोचतेय का? ते सत्तेसाठी लाचार आहेत. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची मराठी संघटना फोडण्यास मदत केली. मुंबईचं गुजरातीकरण करण्याचं कारस्थान सुरूय. मराठी माणसाला तडीपार करायचंय, हा त्यांचा हेतू आहे. असा घणाघातही संजय राऊत यांनी भाजपवर केला.

Sanjay Raut on BJP
MP Sanjay Raut : जरांगेंच्या विरोधात भुजबळांचा वापर केला; संजय राऊतांचा खोचक टोला|Marathi News

भाजपची भूमिका मराठी माणसाला संपवण्याची आहे. उपमुख्यमंत्री दोन आहेत. स्वता:ला कसले मराठी समजताय तुम्ही? राज ठाकरे यांनी देखील यावर भूमिका मांडली नाही. ते भारतीय जनता पक्षासोबत आहेत. ते भाजपची भूमिका पुढे नेत असल्याची टीकाही संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com