Sanjay Raut Latest News saam tv
मुंबई/पुणे

बंडखोरांची राजकीय तिरडी उठवणारच; संजय राऊतांचा हल्लाबोल

निवडणूक आयोगाने शिवसेनेतील दोन्ही गटांना ८ ऑगस्ट रोजी शिवसेना खरी कोणाची यावर लेखी पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: निवडणूक आयोगाने शिवसेनेतील दोन्ही गटांना ८ ऑगस्ट रोजी शिवसेना खरी कोणाची यावर लेखी पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यावर शिवसेनेचे नेत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेना (ShivSena) आमची आहे त्यासाठी पुरावा तुम्हाला काय पाहिजे, सिमा प्रश्नासाठी मेलेले आमचे ६९ आमचे हुतात्मे हा पुरावा आहे. हजारो आंदोलनातून आमची लोक मारली गेलीत हा पुरावा आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आहेत, अस वक्तव्य शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केले. १०-२० लोक पैसे देऊन फोडले हा पुरावा होऊ शकत नाही, असा टोलाही राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला.

शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची आहे, आणि त्या शिवसेनेचे प्रमुख हे उद्धव ठाकरे आहेत. बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक तुम्हाला माफ करणार नाही. राज्यात बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने शिवसेना पुढे निघाली आहे. लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र दिले होते, त्याचे उत्तर त्यांनी दिले नाही. आणि बंडखोरांनी दिलेल्या पत्रावर एका दिवसात निर्णय घेतला, असा आरोपही संजय राऊत यांनी केला.

शिवसेनेने राज्यात अन्यायाच्या विरोधात काम केले आहे. राज्यातील जनता तुम्हाला उत्तर देणार आहे, असंही संजय राऊत म्हणाले. फोन टॅपिंग प्रकरणावर बोलताना राऊत म्हणाले, हे सरकार कोणाचे आहे त्यामुळे आता असा निर्णय घेणार ते. खरं म्हणजे महाराष्ट्र सरकार अस्तित्वातच नाही, एक महिना झाला तरी सरकारचे अस्तित्व दिसत नाही. दोघांचं मंत्रिमंडळ आहे. अजूनही चाचपडत आहेत सरकार बनवण्यासाठी आणि निर्णय घेतात मोठ मोठे जे निर्णय बेकायदेशीर आणि असविधानिक आहेत, असंही राऊत म्हणाले.

निवडणूक आयोगाने दिले दोन्ही गटांना दिले आदेश

शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. भाजपसोबत जात शिंदे गटाने सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण शिवसेनेने शिंदे गटावर कारवाई करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. आता शिवसेना कोणाची या संदर्भात ८ ऑगस्ट रोजी निवडणूक (Election) आयोगाने पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

शिंदे गट आणि शिवसेनेकडून ८ ऑगस्ट रोजी १ वाजेपर्यंत लेखी पुरावे देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता मुळ शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे राहणार याचा निकाल ८ ऑगस्ट रोजी समोर येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: डेटा गोळा करण्याची डेडलाईन संपली! तुमच्या पगारात किती वाढ होणार? समोर आली मोठी माहिती

Maharashtra News Live Update: वीजेच्या खांबाला करंट लागून एका 37 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Diabetes : पांढरा की ब्राऊन, मधुमेहींनी कोणता तांदूळ खावा?

Skin Care Tips : बटाटा की काकडी, डार्क सर्कल्स घालवण्यासाठी काय उत्तम? काय जास्त फायदेशीर?

Gold Rate Today : सणासुदीच्या तोंडावर सोने चांदीच्या दरात विक्रमी वाढ! सोनं इतक्या रुपयांनी वाढलं; जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

SCROLL FOR NEXT