शिवसेनेकडून सुहास कांदेंच्या आरोपांची पोलखोल; पुरावा देऊन दिले उत्तर

आमदार आदित्य ठाकरे यांनी आता महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे.
Suhas Kande Vs Aditya Thackeray In Nashik
Suhas Kande Vs Aditya Thackeray In NashikSaam TV

मुंबई: शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले, त्यामुळे आता शिवसेनेत उभी फूट पडली असल्याचे दिसत आहे. आदित्य ठाकरे यांनी आता महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे, या पार्श्वभूमिवर काल शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी काल माजी मंत्री आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर निधी दिला नसल्याचा आरोप केला. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेनेने काल ट्विट करत आदित्य ठाकरे यांनी आमदार कांदे यांना दिलेल्या निधीची आकडेवारी जाहीर केली आहे.

आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) पर्यावरण मंत्री असताना त्यांनी त्यांच्या खात्याचा एक रुपयाही निधी माझ्या मतदार संघाला दिलेला नाही, असा आरोप आमदार सुहास कांदे यांनी काल केला होता. तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही आरोप केले होते.

Suhas Kande Vs Aditya Thackeray In Nashik
शिवसेना खरी कोणाची? निवडणूक आयोग करणार फैसला; दोन्ही गटांना दिले आदेश

आमदार सुहास कांदे यांच्या या आरोपांना आता शिवसेनेकडून आकडेवारीसह उत्तर दिले आहे. सुहास कांदे यांच्या मतदार संघासाठी आदित्य ठाकरे यांनी पर्यटन विभागाकडून किती निधी दिला याची माहिती दिली शिवसेनेच्या ट्विटर हँडलवरुन दिली आहे.

आमदार सुहास कांदे म्हणाले, आदित्य जी ठाकरे यांनी मतदारसंघासाठी एकही रुपयाही निधी दिला नाही, दिला असेल तर तो दाखवावा मी राजीनामा देईन, हा पाहा निधीचा तपशील. सुहास कांदे आता आपण राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावे, असं ट्विट शिवसेनेने केले आहे.

Suhas Kande Vs Aditya Thackeray In Nashik
जयंत पाटलांना इस्लामपूर न्यायालयाचे वॉरंट; जाणून घ्या काय आहे प्रकरण

निवडणूक आयोगाने दिले दोन्ही गटांना दिले आदेश

शिवसेनेचे (ShivSena) ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंड केले. भाजपसोबत जात शिंदे गटाने सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण शिवसेनेने शिंदे गटावर कारवाई करत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाने शिवसेना आमचीच असल्याचा दावा केला आहे. आता शिवसेना कोणाची या संदर्भात ८ ऑगस्ट रोजी निवडणूक (Election) आयोगाने पुरावे सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

शिंदे गट आणि शिवसेनेकडून ८ ऑगस्ट रोजी १ वाजेपर्यंत लेखी पुरावे देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता मुळ शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह कोणाकडे राहणार याचा निकाल ८ ऑगस्ट रोजी समोर येणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com