Sanjay Raut Criticizes PM Narendra Modi Due To BJP Arrange Road Show After Ghatkopar Hoarding Incident Saam TV
मुंबई/पुणे

Ghatkopar Hoarding Accident: होर्डिंग कोसळून अनेकांचा बळी, त्याच घाटकोपरमध्ये PM मोदींचा रोड शो; संजय राऊतांची टीका

Sanjay Raut on PM Narendra Modi's Road Show in Ghatkoper: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोवरून भाजपवर जोरदार टीका केली आहे.

Vishal Gangurde

मयूर राणे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोवरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. 'मुंबईच्या घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १८ जणांचा बळी गेला आहे. त्याच घाटकोपरमध्ये नरेंद्र मोदींचा रोड शो आहे. पराभवाच्या भीतीने पंतप्रधान मोदींना रस्त्यावर उतरवलं, अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवर केली. ते मुंबईत बोलत होते.

'जिथे जिथे पंतप्रधान मोदी जाणार, तिथे शिवसेना, महाविकास आघाडी जिंकणार आहे', असा दावा देखील राऊत यांनी केला. होर्डिंग दुर्घटनेवर बोलताना राऊतांनी भाजपवर टीका केली. 'वादळामुळे होर्डिंग पडली. या प्रकरणातील दोषींवर कारवाई झाली पाहिजे. आता शिवसेनेची सत्ता नाही. भाजपची सत्ता मुंबई महापालिकेवर आहे. तुमचं प्रशासन काय आहे, येथील पालकमंत्री काय करत आहे? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

अनधिकृत होर्डिंगचे मालक भिंडे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र फोटोवरून भाजपने टीका केली होती. या आरोपांना प्रत्युत्तर देताना संजय राऊत म्हणाले, 'आता कोणाबरोबर कोणाचे फोटो आहेत. मोदी यांच्यासोबत दहा गुंडाचे फोटो आहेत. छगन भुजबळ यांनी जे सांगितलं, ते बरोबर आहे. पैशांनी जीव विकत घेता येता का? मोदी रोड शो करत आहे'.

'ठाणे, मुंबई, नाशिक, भिवंडी, कल्याण आणि दिंडोरी या जागा बहुतेक महाविकास आघाडीच्या असतील. मोदींचा ब्रँड आता संपला आहे. चार  जूननंतर त्यांना हिमालयात जायचं आहे. व्यवस्था महाराष्ट्राने केली आहे, अशी टीका देखील राऊतांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत सिद्धिविनायक दर्शनासाठी दाखल

Orry Weight Loss Tips: ओरीने २० किलोपेक्षा जास्त वजन कमी केले, पहा काय आहे सीक्रेट

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

SCROLL FOR NEXT