Sanjay Raut Criticized Maharashtra Government Saam tv
मुंबई/पुणे

Sanjay Raut : विधान परिषद निवडणुकीत तिन्ही उमेदवार जिंकतील, महायुतीने त्यांचे आमदार सांभाळावेत; संजय राऊतांचा निशाणा

Sanjay Raut News : विधान परिषद निवडणुकीत तिन्ही उमेदवार जिंकतील, महायुतीने त्यांचे आमदार सांभाळावेत, अशा शब्दात संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे.

Vishal Gangurde

मयूर राणे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : विधानपरिषदेच्या ११ जागांच्या निवडणुकीत १२ उमेदवार उभे राहिले आहेत. या निवडणुकीत १२ उमेदवारांपैकी एका उमेदवाराने अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे ही निवडणूक चुरशी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोणते ११ उमेदवार जिंकणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागलं आहे. तसेच या निवडणुकीत एका उमेदवाराचा पराभव होणार आहे. याचदरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे.

संजय राऊत यांनी मुंबई माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलं. संजय राऊत म्हणाले, 'आता कोणाचा फायदा, कोणाला होतो? ही बोलण्याची जागा नाही. शिवसेनेचे सर्व आमदार हे उपस्थित होते. काही गैरहजर होते. काही गावाला होते. ग्रामीण भागातले आमदार हे आज पोहोचतील. शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत'.

'मला खात्री आहे की, ते जिंकणार आहेत. आमचे तिन्ही उमेदवार उद्याच्या विधान परिषद निवडणुकीत विजयी होतील. कोण काय बोलते हे सोडून द्या. महायुतीने त्यांचे आमदार सांभाळावेत. त्यांच्या ३ पक्षातील चर्चेचा विषय आहे. कोणी किती जागा लढवायच्या हा त्यांचा विषय आहे. मी महाविकास आघाडीविषयी बोलू शकतो, असे संजय राऊत पुढे म्हणाले.

वरळी हिट अँड रन प्रकरणातील पीडित कुटुंबीयांना १० लाख रुपयांची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावरूनही संजय राऊत यांनी टीका केली. राऊत म्हणाले, ' जोपर्यंत कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत तुमच्या दहा लाख रुपयांना काही किंमत नाही'.

वरळीतील घटनेवरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. 'राज्याला अशा प्रकारचे गृहमंत्री मिळाला आहे, हे दुर्दैव आहे. गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत? मुंबईच्या रस्त्यावर एक मराठी महिला चिरडून मारली जाते. त्यानंतर फक्त पैसे दिले ,तुमच्या पैशांची मस्ती आहे ना? ती मस्ती मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GK: भारतातून पदवी घेतली? 'या' देशात भारतीय पदवीला मान्यता नाही, जाणून घ्या

Online Food Delivery Scam : संतापजनक! ऑनलाईन मागवलेल्या अंड्यांमध्ये आढळल्या अळ्या, विरारमध्ये नेमकं काय घडलं?

PCOS vs Thyroid Test: पीसीओएस की थायरॉइड समस्या? 'या' चाचण्यांच्या माध्यमातून समजू शकतो फरक

Maharashtra Live News Update: मावळमध्ये महाविकास आघाडीची घोषणा, पाच पक्ष आले एकत्रित, पण सत्ता मिळेल का?

Wikipedia ला टक्कर देणार 'हे' नवं सॉफ्टवेअर, एलोन मस्कची घोषणा

SCROLL FOR NEXT