Chanakya Niti: तुमच्याही आजूबाजूला टॉक्सिक लोक खूप आहेत? कसं ओळखायचं? चाणक्यांनी सांगितल्या 5 सिक्रेट टिप्स

Sakshi Sunil Jadhav

नवे नातेसंबंध

आजच्या धावपळीच्या जगात मैत्री, ऑफिस, नातेसंबंध यामध्ये अनेकदा टॉक्सिक लोक भेटतात. पण ते मागे तुम्हाला बऱ्याच गोष्टी बोलतात. याने तुमचा स्वत: वरचा विश्वास उडू शकतो.

Chanakya Niti

खोटं हसणारे लोक

चाणक्य सांगतात, प्रत्येक हसरा चेहरा आपला नसतो. टॉक्सिक लोक गोड बोलून विश्वास मिळवतात, पण मागून नुकसान करतात.

Chanakya Niti

नकारात्मक बोलणारे

नेहमी तक्रार, टीका आणि नकारात्मक चर्चा करणारे लोकांमध्ये राहिल्याने तुमच्या विचारात बदल होईल. अशा लोकांपासून दूर राहणंच शहाणपणाचं आहे.

Chanakya Niti

तुमची सीमा ठरवा

जे लोक तुमच्या मर्यादांचा आदर करत नाहीत, ते तुमचाही आदर करत नाहीत. चाणक्य नितीनुसार सीमा आखणं हा उद्धटपणा नसून गरज आहे.

Toxic relationship signs

मौनाला शस्त्र करा

प्रत्येक टोमण्याला उत्तर देणं गरजेचं नसतं. अनेकदा शांत राहिल्यानेही टॉक्सिक लोक स्वतःच माघार घेतात.

Toxic relationship signs

स्वतःला प्राधान्य द्या

स्वतःची मानसिक शांती जपणं हा स्वार्थ नाही, तर गरज आहे. चाणक्य म्हणतात, आत्मसंरक्षण हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे.

Toxic relationship signs

भावनिक खेळ ओळखा

टॉक्सिक लोक अपराधीपणाची भावना निर्माण करून आपल्याला नियंत्रित करतात. अशा भावनिक खेळी वेळेत ओळखणं महत्त्वाचं आहे.

Chanakya Niti toxic people

आत्मसन्मान जपा

जे लोक सतत तुम्हाला कमी लेखतात, ते तुमच्या प्रगतीचे शत्रू असतात. चाणक्य नितीनुसार आत्मसन्मान सर्वात मोठी संपत्ती आहे.

Chanakya Niti toxic people

NEXT: Tuesday Horoscope: तब्येतीकडे लक्ष द्या, 5 राशींचं भाग्य उजळणार, वाचा मंगळवारचे राशीभविष्य

Daily Horoscope | Saam TV
येथे क्लिक करा