Sanjay Raut On Vasant More: शिवसेनेत 'वसंत' फुलला - संजय राऊत

Vasant More News: राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे.वसंत मोरेंचा अखेर ठाकरेंच्या शिवसेनेत कमबॅक झाला आहे.

वसंत मोरेंनी अखेर वंचित बहुजन आघाडीला निरोप देत, ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. वसंत मोरेंची सुरुवात ही शिवसेनेतून झाली होती. आणि आता शेवट पुन्हा शिवसेनेतच झाला आहे. असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले. वसंत मोरे यांच्या पक्षप्रवेशावेळी संजय राऊत, उद्धव ठाकरे तसेच अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोरेंचा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी संजय राऊतांनी एक मोठं वक्तव्य केलं.म्हणाले, शिवसेनेत पुन्हा वसंत फुलला आहे, पुणे ,खडकवासला वसंत मोरेंच्या पक्ष्प्रवेशामुळे ठाकरे गटाची ताकद वाढणार असल्याचं राऊत यावेळी म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com