sanjay raut and eknath khadse's phone tapped by mentioning them Social nuisance Saam Tv
मुंबई/पुणे

Phone Tapping Case: धक्कादायक! खडसे-राऊत समाजकंटक असल्याचे दाखवून केले फोन टॅपिंग

Maharashtra Phone Tapping Case: खडसेंचा फोन 67 दिवस आणि राऊत यांचा फोन 60 दिवस टॅप करण्यात आला होता.

सुरज सावंत

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचे फोन समाजकंटक म्हणून टॅप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती मुंबई पोलिस (Mumbai Police) सूत्रांनी दिली आहे. यावेळी तपासादरम्यान एसआयडीकडून मिळालेल्या पत्रात असे दिसून आले की, एसआयडीने एसीएस होमला त्यांचे फोन टॅप (Phone Tapping) करण्यासाठी दिलेल्या अर्जात राऊत (Sanjay Raut) आणि खडसे (Eknath Khadse) यांच्याऐवजी दुसरे नाव वापरले होते आणि त्यांना "सामाजिक घटक विरोधी" म्हटले गेले होते. या कारणास्तव एसीएस होमने त्यावेळी फोन टॅपिंगला परवानगी दिली, त्यानंतर खडसेंचा फोन 67 दिवस आणि राऊत यांचा फोन 60 दिवस टॅप करण्यात आला. तसेच पटोलेंचाही फोन टॅप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. (sanjay raut and eknath khadse's phone tapped by mentioning them Social nuisance)

हे देखील पहा -

फोन टॅपिंग प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांनी गृहखात्याची परवानगी घेताना, आमचे नंबर ट्रेस करताना आम्ही समाज विघातक आहोत, ड्रग पेडलर आहोत, माफिया आहोत असं सांगून आमचे फोन टॅपिंग केले असे संजय राऊत म्हणाले. यामध्ये संजय राऊत (Sanjay Raut), एकनाथ खडसे, नाना पटोले (Nana Patole) यांची नावं प्रामुख्याने आहेत.

फोन टॅप प्रकरण काय आहे?

डॉ. रश्मी शुक्ला राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना त्यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने राज्य शासनाला अहवाल दिला होता. यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅप केल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला होता.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Final Results : महाराष्ट्र कुणाचा? विधानसभा निवडणूक निकालाचे सविस्तर अपडेट्स एका क्लिकवर

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT