Sanjay Rathod Chitra Wagh
Sanjay Rathod Chitra Wagh Saam TV
मुंबई/पुणे

संजय राठोडांनी मंत्रिपदाची घेतली शपथ, पण चित्रा वाघ यांच्या राजीनाम्याची मागणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी तात्काळ भारतीय जनता पार्टीच्या पदाचा राजीनामा द्यावा आणि पुजा चव्हाणला न्याय मिळवून देण्यासाठी लढावे, फक्त ट्विट करत बसू नये अशी प्रतिक्रिया भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी चित्रा वाघ यांच्या ट्विटवरती दिली आहे.

देसाई म्हणाल्या, 'पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असताना भाजपने राजीनामा घेतलेल्या संजय राठोड (Sanjay Rathod) यांना मंत्रीपद देणे हे दुर्दैवी आहे. शिवाय संजय राठोड हे आज पहिल्या रांगेत होतेच शिवाय त्यांना मंत्रीमंडळात स्थान देखील देण्यात आलं असून जर आपणाला पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणात तिला खरचं न्याय मिळवून द्यायचा आहे.

तसंच राठोड यांना मंत्रीपदी घेणं दुर्दैवी आहे असं म्हणत बसण्यापेक्षा तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या पदाचा राजीनामा द्यावा. शिवाय तुम्ही लढा आणि जिंकासुद्धा मात्र भाजपमध्ये (BJP) राहून ते शक्य नाही कारण तुमच्याच पार्टीने त्यांना मंत्रीपद दिलं आहे. असंही देसाई म्हणाल्या.

पाहा व्हिडीओ -

आज यवतमाळमधील शिवसेना नेते आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांनी आज एकनाथ शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

'पुजा चव्हाण च्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे. लडेंगे...जितेंगे! असं ट्विट वाघ यांनी केलं आहे. त्यांच्या याच ट्विटवरुन तृप्ती देसाई यांनी वाघ यांनी राजीनामा द्यावा असं म्हटलं आहे.

काय आहे पुजा चव्हाण मृत्यू प्रकरण ?

बीड जिल्ह्यातील पुजा चव्हाण (Pooja Chavan) या तरुणीने पु्ण्यात आत्महत्या केली होती. या प्रकरणी शिवसेना नेते तत्कालीन आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड हे संशयाच्या भोवऱ्यात सापडले होते. तर हे प्रकरण भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी लावून धरलं होतं.

पुण्यातील वानवडी येथील एका सोसायटी मध्ये पुजा राहत होती. ७ फेब्रुवारीच्या रात्री तिने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर काही दिवसांतच या प्रकरणाशी विदर्भातील एका कॅबिनेट मंत्री म्हणजेच संजय राठोड यांचा संबंध असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis Pune News : आम्ही घर फोडत नाही, पक्ष फोडत नाही; देवेंद्र फडणवीसांकडून विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर

Today's Marathi News Live : शरद पवारांकडून मनोज जरांगे पाटलांचं कौतुक

Arvind Kejriwal : तुरुंगात गेल्यानंतरही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला नाही? अरविंद केजरीवालांनी सांगितली कारणे

Abdu Rozik : 'बिग बॉस' फेम अब्दु रोझिकचा पार पडला साखरपुडा!

Astro Tips: घरात कोणत्या दिशेला लावावे मोराचे पीस?

SCROLL FOR NEXT