निवृत्ती बाबर
Mumbai News: खासदार संजय राऊत यांनी खारघर दुर्घटना प्रकरणावरून राज ठाकरेंवर केलेल्या टीकेला मनसेने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंवरील टीकेला संजय राऊत यांना नाव न घेता प्रत्युत्तर दिलं आहे. 'भटके कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी भांडुपला गाडी पाठवण्यासाठी मुंबई आयुक्ताला पत्र लिहिणार आहे, असा उपरोधिक टोला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना नाव न घेता लगावला आहे. (Latest Marathi News)
आज संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भाजपचा पोपट म्हणत टीका केली होती. संजय राऊतांवर टीका करताना म्हणाले, 'मुंबई महापालिकेची भटके कुत्रे पकडण्यासाठी एक गाडी फिरायची. ती गाडी भटक्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करायची. मुंबई महापालिकेने ती गाडी पुन्हा सुरू करावी'.
'मी इकबाल सिंग यांना पत्र लिहणार आहे. मुंबई महापालिकेने ती गाडी पहिली भांडुपला पाठवा. कारण त्यांच्या जिभेची नसबंदी करावी असं मी पत्र लिहणार आहे. म्हणजे ते वटणीवर येतील, असा टोला संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांना नाव न घेता लगावला आहे.
संजय राऊत यांनी राज ठाकरे उठ-सूट उद्धव ठाकरेंचे नाव घेतात अशी टीका केली होती. 'संजय राऊतांना मानसिक उपचाराची गरज आहे. त्यासाठी पत्रही लिहिलं होतं. भ्रष्टाचार म्हटलं की पहिलं नाव उद्धव ठाकरे यांच आठवतं. बेईमानी म्हटलं की उद्धव ठाकरेंची आठवण येते', अशी टीका देशपांडे यांनी केली.
'दूसरे के पाप गिनाने से अपने जुर्म कम नही हो जाते, संजय राऊत हे राष्ट्रवादीच्या बोक्यानी पाळलेले उंदीर आहेत, अशीही टीका देशपांडे यांनी केली.
काय म्हणाले होते संजय राऊत?
'भारतीय जनता पक्षाने एवढे पोपट पाळून ठेवलेले आहेत. त्यांना बोलू द्या, पोपटपंची करू द्या. गंगेमध्ये हजारांहून अधिक प्रेते वाहत गेली. नोटबंदी काळात रांगेत काही लोकांचा मृत्यू झाला. हा सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा आहे. त्याच्यावरती सुद्धा त्यांना बोलायला सांगा, भाजपच्या पोपटांना बोलायला सांगा, असा टोला राऊत यांनी लगवाला.
'ते जगाचे नेते आहेत. काय मागण्या करताय? कोणासाठी करताय? लोक तडफडून मेले आणि बाजूला मेजवानांना सुरू आहेत. त्या मेजवानीवर बोला. ढिसाळ आयोजनावर बोला, कशा करीता हा खारघरचा कार्यक्रम केला त्याच्यावरही बोला. 'उठ-सूट उद्धव ठाकरे, झोपेत उद्धव ठाकरे आणि जागेपणी उद्धव ठाकरे, असा टोला राऊत यांनी राज ठाकरे यांना लगावला
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.