Breaking News: समीर वानखेडेंना आर्यन खान प्रकरणाच्या तपासावरुन हटवलं! Twitter/@ANI
मुंबई/पुणे

समीर वानखेडेंना आर्यन खान प्रकरणाच्या तपासावरुन हटवलं !

अनेक दिवसांपासून चर्चा होत्या की समीर वानखेडेंना तपासावरुन हटवलं जाणार.

सुरज सावंत

मुंबई: आर्यन खान तपासाच्या प्रकरणावरुन समीर वानखेडे यांना हटवण्यात आले आहे. समीर वानखडे यांच्या जागी संजय सिंह हे कार्डिलिया क्रूझचा तपास करणार आहेत. नुसता कार्डिलिया प्रकरणाचा नाही तर नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचा तपासही दिल्लीचे पथक करणार आहे. समीर वानखडे यांनी पीटीशन टाकली होती त्यानुसार दिल्लीचे एनसीबी स्पेशल टिम या पुढचा तपास करणार आहे. मुंबई एनसीबी झोनल डायरेक्टर पदी वानखेडे कायम असतील असं त्यांनी स्वत: सांगितले आहे. समीर वानखेडे यांच्याकडील तपास काढून घेतल्यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी ट्विट करत या याचं स्वागत केलं आहे.

दरम्यान आर्यन खान प्रकरणात चर्चेत आलेले अधिकारी समीर वानखेडे प्रकरण मागच्या काही काळात खूप गाजलं. मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून समीर वानखेडेंवर आरोप केले. समीर वानखेडे यांच्या नावावर प्रश्नचिन्ह उपस्थीत करत त्यांनी समीर वानखेडे यांच नाव समीर ज्ञानदेव वानखेडे नसून समीर दाऊद वानखेडे आहे असा धक्कादायक खुलासा त्यांनी केला, तसे पुरावे देखील त्यांनी माध्यमांसमोर आणले. समीर वानखेडे यांच्या बाजूने त्यांचे वडील बायको बाजू मांडत होते. समीर वानखेडे यांनी आर्यन खानवर केलेली कारवाई फर्जीवाडा असल्याचं मलिक म्हणाले. त्यांनतर समीर वानखेडे यांची चौकशी करण्यासाठी देखील दिल्ली वरुन एनसीबीची तीन सदस्यीय समीती मुंबईत दाखल झाली.

आर्यन खान तब्बल २८ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याची जामीनावर सुटका करण्यात आली. त्यांनतर आर्यन खान प्रकरण हे किरण गोसावी , प्रभाकर साईल, नवाब मलिक, आणि समीर वानखेडे यांच्याभोवती फिरु लागलं. समीर वानखेडे मुंबई झोनल डायरेक्टर पदावर कायम असणार आहेत. बाकी प्रकरणाचा तपास संजय सिह हे आयपीएस अधीकारी करणार आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: बोगस जन्म-मृत्यू दाखले रद्द करा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Pooja Sawant Lovestory: आईच्या मैत्रिणीमुळे झाली ओळख, कशी आहे? पूजा सावंतची लव्हस्टोरी

Maharashtra Live News Update : सोलापुरात धावत्या कारला अचानक भीषण आग

'जगाचा अंत अवघ्या महिनाभरात होणार'; नव्या भविष्यवाणीने सर्वत्र खळबळ, नेमकं काय घडणार?

Ladoo Recipe : हिवाळ्यात आरोग्यासाठी वरदान ठरेल 'हा' लाडू

SCROLL FOR NEXT