Sameer Wankhede News, Aryan Khan Latest News
Sameer Wankhede News, Aryan Khan Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

Sameer Wankhede: आर्यन खानला क्लीन चिट; समीर वानखेडे म्हणाले, 'माफ करा...'

Nandkumar Joshi

नवी दिल्ली: मुंबईतील कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (cordelia cruise drugs case) बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीकडून क्लीन चिट मिळाल्यानंतर एनसीबीच्या कारवाईवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. विविध स्तरांतून याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. राज्याचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या ट्विटर हँडलवरूनही समीर वानखेडेंवर पुन्हा निशाणा साधला आहे. आर्यन खानला (Aryan Khan) क्लीन चिट मिळाल्यानंतर समीर वानखेडे यांनी पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे. मी सध्या एनसीबीमध्ये कार्यरत नाही. यावर मी काहीच टिप्पणी करू इच्छित नाही, असे वानखेडे म्हणाले. (Aryan Khan Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

एनसीबी मुंबई विभागाचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने मुंबईतील कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टीदरम्यान छापेमारी केली होती. गेल्या वर्षी २ आणि ३ ऑक्टोबरच्या मध्यरात्री या क्रूझवर ड्रग्ज पार्टी सुरू होती. त्यावेळी एनसीबीने आर्यन खानसह अनेकांना ताब्यात घेतले होते. अंमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपांखाली त्यांना अटक झाली होती. या प्रकरणात दोषारोपपत्र दाखल करण्याची कोर्टाने दिलेली मुदत संपल्यानंतर आज, शुक्रवारी एनसीबीने दोषारोपपत्र दाखल केले. त्यात आर्यन खान याच्यासह सहा जणांना क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यामुळे एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

याबाबत एका हिंदी वृत्तवाहिनीने समीर वानखेडे यांना प्रश्न विचारले. त्यावर, 'क्षमा करा, मी याबाबत काहीच टिप्पणी करू शकत नाही. मी सध्या एनसीबीमध्ये नाही. यासंदर्भात एनसीबीच्या अधिकाऱ्यांशी बोलावे,' असे वानखेडे म्हणाले.

आर्यनची जामिनावर झाली होती सुटका

ड्रग्ज पार्टी प्रकरणात आर्यन खान याला एनसीबीच्या पथकाने ३ ऑक्टोबर २०२१ रोजी अटक केली होती. चौकशीनंतर आर्यनची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. कनिष्ठ न्यायालयाने सुरुवातीला त्याला जामीन देण्यास नकार दिला होता. त्यानंतर आर्यन याने जामिनासाठी वकिलांमार्फत मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने त्याला २८ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता. कायदेशीर प्रक्रिया अपूर्ण राहिल्याने दोन दिवस त्याला तुरुंगात राहावे लागले होते. त्यानंतर ३० ऑक्टोबर रोजी त्याची तुरुंगातून जामिनावर सुटका झाली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhuri Dixit : माधुरीच्या सौंदर्याने 'हे' दिग्गज अभिनेते झाले होते घायाळ, मात्र ती पडली डॉक्टरांच्या प्रेमात

Daily Horoscope: या राशींनी सतर्क राहा, ताण-तणावावर नियंत्रण ठेवा; वाचा आजचे राशिभविष्य

Rashi Bhavishya: कन्यासह ४ राशीसाठी बुधवार खास, तुमची रास?

Tata आणि Citroen च्या दोन नवीन कार ऑगस्टमध्ये होणार लॉन्च, जाणून घ्या फीचर्स

405 लिटरची बूट स्पेस, 19 Kmpl मायलेज, जबरदस्त आहे Renault ची ही 5 Seater Car

SCROLL FOR NEXT