Mumbai News: केंद्रात, राज्यात तुमचे सरकार, छत्रपतींचे स्मारक का उभारले नाही? संभाजीराजे आक्रमक; मुंबईत हायहोल्टेज ड्रामा  Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai News: छत्रपती संभाजीराजे संतापले, शिवस्मारक शोधण्यासाठी अरबी समुद्रात जाणार; मुंबईत काय घडतंय? VIDEO

Sambhajiraje Chhatrapati: छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले असून हजारो मावळ्यांना घेऊन ते अरबी समुद्र परिसरात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यावेळी पोलिसांनी अडवल्याने छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

Gangappa Pujari

सिद्धेश म्हात्रे, मुंबई

Sambhajiraje Chhatrapati Mumbai Protest: छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या वतीने आज शिवस्मारक शोधमोहीम सुरु केली आहे. २०१६ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर शिवस्मारकाचे जलपूजन केले होते. मात्र ८ वर्षे झाले तरी कोणतेही काम झालेले नाही. प्रत्यक्षात कामही सुरु झालेले नाही, मात्र शेकडो कोटी रुपयांचा निधी खर्च झालेला आहे. याचा जाब विचारण्यासाठी छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाले असून हजारो मावळ्यांना घेऊन ते अरबी समुद्र परिसरात जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यावेळी पोलिसांनी अडवल्याने छत्रपती संभाजीराजे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

छत्रपती संभाजीराजे संतापले!

यावेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, "आम्ही आंदोलन करण्यासाठी नाही आलो. कायदा कोणी हातात घ्यायचा नाही. 13 कोटी जनतेसमोर हा विषय घेऊन जायचा आहे. जीवित स्मारक जिवंत राहावेत हा माझा प्रयत्न आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. इथे स्मारक व्हावं ही सर्व पुढाऱ्यांची इच्छा होती. पहिली घोषणा छत्रपती शाहू महाराज यांनी केली. मुंबई मनपासमोर महाराजांचे स्मारक उभे राहावे. मुंबई सारख्या ठिकाणी जिथे जग पाहिलं तिथे स्मारक झाले पाहिजे, अशी इच्छा आहे. प्रथम सुशीलकुमार शिंदे यांनी आश्वासन नंतर 2014 ला भाजपने आश्वासन दिले.

भाजपला सवाल..

"मुंबई निवडणुकी आधी देशाचे पंतप्रधान यांच्या हस्ते जलपूजन केले. त्यावेळी 100% परवानगी मिळेल त्याशिवाय पंतप्रधान येत नाही. जसे सरदार पटेलांच स्मारक तस महाराजांचे व्हावे ते देशाचे दैवत आहेत. पर्यावरणाची अडचण झालेय कोर्टात अडकलाय म्हणून आमही काही करू शकत नाही. जलपूजन केलं एलएनटी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट झालं मग पुढे काय झाले? हे राजकीय भाषण नाही मि त्या घरातला आहे, माझा तो हक्क आहे. पीआय गुरव येतो, भाजपा चे सरकार आहे, बोटीची परवानगी रद्द करु म्हणतो, ही कसली दादागिरी?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT