Sambhaji Bhide Controversial Statement saam tv
मुंबई/पुणे

Sambhaji Bhide Controversial Statement : 15 ऑगस्ट हा काळा दिवस, संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य; राष्ट्रगीत, राष्ट्रध्वजावर बोलताना म्हणाले...

Sambhaji Bhide Statement: देशाचा स्वतंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जाणारा 15 ऑगस्ट हा काळा दिवस असल्याचे भिडे यांनी म्हटले आहे.

Chandrakant Jagtap

Sambhaji Bhide News: शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे हे अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादात सापडले आहेत. आता पुन्हा एकदा त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. देशाचा स्वतंत्र्य दिवस म्हणून साजरा केला जाणारा 15 ऑगस्ट हा काळा दिवस असल्याचे भिडे यांनी म्हटले आहे. तसेच देशाचं राष्ट्रगीत आणि राष्ट्रध्वजावरही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

संभाजी भिडे म्हणाले, 15 ऑगस्ट खरा स्वातंत्र्य दिवस नाही. या दिवशी फाळणी झाली होती, त्यामुळे तो काळा दिवस असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भिडे यांच्या या वक्तव्यावरुन पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील दिघी येथे रविवारी संभाजी भिडें यांचं जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेकडून या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना भिडे यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारताला राजकीय स्वातंत्र्य हे 15 ऑगस्ट 1947 लाच मिळालं आहे. अर्थात आपल्या सर्वांमध्ये हे शल्य आहे की, भारताची फाळणी झाली. आपल्याला अखंड भारत पाहायचाय.

त्यामुळे अखंड भारत जेव्हा होईल तेव्हाच आपल्याला समाधान मिळणार आहे. याचा अर्थ 15 ऑगस्ट 1947 हा भारताचा स्वातंत्र्य दिन नाही असं कोणी त्या अर्थाने म्हणत असेल तर ते योग्य नाही, तोच आपला स्वातंत्र्य दिवस आहे, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली आहे. (Marathi Tajya Batmya)

संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?

संभजी भिडे म्हणाले, जन गण मन हे राष्ट्रगीत होऊ शकत नाही. कारण रवींद्रनाथ टागोर यांनी ते 1898 ला इंग्लंडच्या राजाच्या स्वागतासाठी लिहलं होतं. 15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही, या दिवशी भारताची फाळणी झाली. (Latest Political News)

या दिवशी सर्वांनी उपवास कारावा आणि दुखवटा पाळावा. भारताचा राष्ट्रध्वज जोपर्यंत भगवा म्हणून स्विकारला जात नाही, नमस्कार नाही. आपली स्वातंत्र्य देवता जोधाबाई सारखी मुसलमानांच्या जनानखान्यातील बटीक नसेल तर ती सीतेसारखी पतिव्रता असेल, असेही भिडे म्हणाले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Make Yourself Happy: स्वतःला खुश ठेवण्याचे हे ७ मार्ग माहिती आहेत का?

Solar Agri Pump: सौर कृषी पंपची चोरी झालीय? कुठे कराल तक्रार? जाणून घ्या हेल्पलाईन नंबर

Ind vs Eng: एक ओव्हर, दोघे गारद; भारताच्या नितीशकुमार रेड्डीचा इंग्लंडला जोरदार दणका

Kids Health Tips: लहान मुलांना अंड खाण्यास दिल्यानंतर दुध किती तासांनी द्यावे?

Fraud : बनावट शासन निर्णयाद्वारे ५ कोटींची कामे मंजूर; ठेकेदारावर गुन्हा दाखल, ठेकेदार फरार

SCROLL FOR NEXT