Salman Khans Firing Case ANI
मुंबई/पुणे

Salman Khans Firing Case: सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी सापडले, दोघांना गुजरातमधून अटक

Salman Khans House Firing Case: सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अखेर शोधून काढलं आहे.

Satish Daud

Salman Khans House Firing Case

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान याच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. भाईजानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अखेर शोधून काढलं आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुजरातच्या भूज येथून सोमवारी (ता. १५) रात्री दोन आरोपींना अटक केली आहे. लवकरच त्यांना मुंबईत आणले जाणार आहे. (Breaking Marathi News)

विक्की साहब गुप्ता (वय २४) आणि सागर श्रीजोगेंद्र पाल (वय २१) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोन्ही आरोपी बिहारमधील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील मसिही येथील रहिवासी आहेत. याच आरोपींनी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

रविवार १४ एप्रिलच्या पहाटे बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) याच्या वांद्रेतील घराबाहेर अज्ञात आरोपींनी गोळीबार केला होता. दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी अवघ्या ७ सेकंदात सलमानच्या घरावर ४ गोळी झाडल्या होत्या. या घटनेनं मोठी खळबळ उडाली होती.

गोळीबारानंतर आरोपी फरार झाले होती. या घटनेची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली. तसेच आरोपींच्या शोधासाठी २० वेगवेगळी पथके तयार केली होती. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरु केला होता.

याप्रकरणी मुंबई पोलिसांनी सोमवारी (ता. १५) पनवेलमधून दोन संशयितांना ताब्यात देखील घेतलं होतं. त्यांची कसून चौकशी केली असता, गोळीबाराचे धागेदोरे बिहारपर्यंत गेले. दरम्यान, गोळीबार करून पळून गेलेले आरोपी हे गुजरातच्या भूज येथे लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत दोन्ही आरोपींना अटक केली.

आपणच सलमान खानच्या घरावर गोळीबार केला, अशी कबुली आरोपींनी पोलिसांना दिल्याची माहिती आहे. या दोन्ही आरोपींना लवकरच मुंबईत आणले जाणार आहे. दरम्यान, सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात लॉरेन्स बिष्णोई गँगचा सहभाग आहे, असं प्राथामिक चौकशीत निष्पन्न झाल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे.

Swiggy CEO networth : स्विगीचे सीईओंचं शिक्षण आणि नेटवर्थ किती?

Maharashtra News Live Updates: पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टर मधील बॅगांची करण्यात आली तपासणी

Viral Video: भंयकर वास्तव! पाय ठेवायला जागा नाही, तरीही भाऊचा लोकलच्या दारात उभं राहून प्रवास, व्हिडीओ पाहा

Solapur Airport : सोलापूरकरांचे नागरी विमानसेवेचे स्वप्न साकार! २० डिसेंबरपासून मुंबई आणि गोवासाठी विमानसेवा

Viral Video: नजर हटी... मोबाइलच्या नादात भरकटला, दुचाकी थेट कारला धडकली, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद!

SCROLL FOR NEXT