NIA Arrested Salim Fruit
NIA Arrested Salim Fruit Saam Tv
मुंबई/पुणे

दाऊद इब्राहीमचा हस्तक सलीम फ्रुट 'एनआयए'च्या ताब्यात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक सलीम फ्रुट याला एनआयए (NIA) ने ताब्यात घेतलं आहे. या अगोदरही ईडीने फ्रुट याला ताब्यात घेतलं होते. मुंबईत एकुण २० ठिकाणी कारवाई झाल्याची माहिती आहे. त्यात छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इक्बाल मिर्ची, दाऊदची बहीण हसिना पारकर आणि त्याच्या नातेवाईकांशी संबंधित लोकांचा समावेश आहे. दाऊद टोळीच्या जवळचा व्यक्ती सलीम फ्रूटला ताब्यात घेतले आहे. एनआयने सलीमच्या घरावर छापे टाकले आहेत.

दाऊद इब्राहिमच्या (Dawood Ibrahim) जवळच्या व्यक्तींवर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) मोठी कारवाई केली. ही कारवाई दाऊदचे शार्प शूटर, तस्कर, डी-कंपनीचे रिअल इस्टेट मॅनेजर यांच्याशी संबंधीत आहेत. याशिवाय अनेक हवाला ऑपरेटर्सवरही छापे टाकण्यात आले आहेत.

एनआयएने बोरिवली, सांताक्रूझ, वांद्रे, नागपाडा, गोरेगाव, परळ येथील २० ठिकाणी छापे टाकले आहेत. माहितीनुसार, गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार, एनआयएने दाऊद इब्राहिम, डी कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला होता, ज्यावर ही चौकशी आणि छापेमारी सुरू आहे.

कोण आहे सलीम फ्रुट

सलीम फ्रुट हा छोटा शकीलचा मेहुणा आहे. शकील आपल्या गुंडांच्या माध्यमातून खंडणीचे रॅकेट चालवतो. सलीम फ्रुटला २००६ मध्ये युएई मधून भारतात पाठवण्यात आले होते आणि २०१० पासून तो तुरुंगात होता. सलीम फ्रुटशिवाय दाऊद इब्राहिमचा मेहुणा सौद युसूफ तुंगेकर, दाऊदचा धाकटा भाऊ इक्बाल कासकरचा साथीदार खालिद उस्मान शेख आणि दाऊदची दिवंगत बहीण हसिना पारकरचा मुलगा आलीशान पारकर यांचेही जबाब नोंदवले जाऊ शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

यवतमाळ : सायखेडानजीक 2 ट्रकचा भीषण अपघात, 150 बकऱ्यांसह तिघे जागीच ठार

Shweta Tiwari: संतुर मॉम श्वेताची थायलंड सफर; फोटो...

Water Reserve inside moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा पाच ते आठ पट अधिक पाणी; ISROच्या अभ्यासात मोठा खुलासा

Ratnagiri Tourist Places : उन्हाळ्यात फिरण्यासाठी नयनरम्य ठिकाणे; रत्नागिरीमधील 'या' सुंदर समुद्रकिनाऱ्याला नक्की भेट द्या

Ramdas Athawale : भाजप खरंच संविधान बदलणार का? रामदास आठवलेंनी सांगितलं यामागचं खरं कारण

SCROLL FOR NEXT