Water Reserve inside moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा पाच ते आठ पट अधिक पाणी; ISROच्या अभ्यासात मोठा खुलासा

isro discovered water inside moon : 'चंद्रावर अपेक्षेपेक्षा अधिक बर्फ आहे. चंद्रावरील जमीनीत बर्फ असून आहे. त्यामुळे पाण्याला शोधता येऊ शकतं. या पाण्याचा उपयोग करून चंद्रावर लोकवस्ती निर्माण होऊ शकते, असा खुलासा इस्रोने केला आहे.
Water Reserve inside moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा पाच ते आठ पट अधिक पाणी; ISROच्या अभ्यासात मोठा खुलासा
Spacecraft Land On MoonSaam Digital

नवी दिल्ली : 'चंद्रावर अपेक्षेपेक्षा अधिक बर्फ आहे. चंद्रावरील जमीनीत बर्फ असून आहे. त्यामुळे पाण्याला शोधता येऊ शकतं. या पाण्याचा उपयोग करून चंद्रावर लोकवस्ती निर्माण होऊ शकते, असा खुलासा इस्रोने केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, इस्रोच्या नव्या अभ्यासात चंद्राबाबत नवा खुलासा समोर आला आहे. चंद्रात्या जमीनीत दोन-चार मीटर खाली अपेक्षेपेक्षा अधिक बर्फ आहे. हा बर्फ पाच ते आठ पट अधिक आहे. बर्फाचा हा खजीना चंद्राच्या दोन्ही ध्रुवावर आहे. चंद्रावरील जमीनीत ड्रिलिंग करून बर्फाचा शोध घेता येऊ शकतो. या शोधामुळे भविष्यात चंद्रावर माणूस दिर्घ काळासाठी राहू शकतो. यामुळे जगातील सर्व स्पेस एजन्सींना होईल.

Water Reserve inside moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा पाच ते आठ पट अधिक पाणी; ISROच्या अभ्यासात मोठा खुलासा
SRK & ISRO | शाहरूखने ISRO च्या शास्त्रज्ञांना ओढून स्वत: जवळ आणले Video Viral #srk #isro

इस्रोच्या माहितीनुसार, चंद्राच्या उत्तर ध्रुवाच्या तुलनेत दक्षिण ध्रुवावर अधिक बर्फ आहे. चंद्रावर बर्फ कुठून आला, याबाबत इस्रोने संशोधन केलं. या काळाचं उत्तर इंब्रियन काळात मिळतं, असे इस्रोने म्हटलं. चंद्र तयार होत होता, ज्वालामुखीतून निघाणारा गॅस हा लाखो वर्षांच्या अवधीने हळूहळू चंद्राच्या जमिनीत बर्फाच्या रुपात जमा होत गला.

शास्त्रज्ञांनी अमेरिकी लूनर रीकॉन्सेंस ऑर्बिटर आणि चंद्रयान-२च्या ऑर्बिटरमधून मिळालेल्या डेटाचं विश्लेषण केलं. तसेच एलआरओच्या न्यूट्रॉन, स्पेक्ट्रोमीटर, ऑप्टिकल, राडार, लेजर, अल्ट्रा-वॉयलेट स्पेक्ट्रोमीटर आणि थर्मल रेडियोमीटरमधून डेटा घेण्यात आला. चंद्रावरील बर्फाच्या पाण्याची उत्पत्ती, प्रसार आणि विभागणी समजण्यासाठी डेटा घेण्यात आला.

Water Reserve inside moon : चंद्रावर अपेक्षेपेक्षा पाच ते आठ पट अधिक पाणी; ISROच्या अभ्यासात मोठा खुलासा
ISRO: इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांच्या आत्मचरित्राचा काय आहे वाद; पुस्तक मागे का घेतलं?

या नव्याने अभ्यास करताना शास्त्रज्ञांनी जुन्या अभ्यासाला समर्थन दिलं. स्पेस अॅप्लिकेश सेंटरने चंद्रयान-२ च्या ड्युल फ्रिक्वेंसी सिंथेटिक अपर्चर राडार आणि पोलॅरीमेट्रिक राडारचा डेटाचा वापर करण्यात आला. त्यावेळी चंद्राच्या काही खड्ड्याच्या आत बर्फ असल्याचे माहिती मिळाली. तत्पूर्वी, इस्रो पाण्याचा शोध घेण्यसाठी स्पेस एजन्सी ध्रुवावर मिशन आणि ड्रिलिंग मशीन पाठवू शकतात.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com