mla rohit pawar, maratha reservation, kopardi saam tv
मुंबई/पुणे

Maratha Andolan In Kopardi : आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसू नये : राेहित पवार

Mla Rohit Pawar News : आंदाेलकांची कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.

Siddharth Latkar

- सुशिल थाेरात

Maratha Andolan Latest News : मराठा आरक्षण प्रश्ना बाबत मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसू नयेत अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली. आमदार पवार यांनी आज काेपर्डीत मराठा आंदाेलक उपाेषणकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी साम टीव्हीशी संवाद साधला. (Maharashtra News)

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी गेल्या दोन दिवसांपासून कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावामध्ये मराठा समाजाच्या वतीने उपोषण सुरू करण्यात आले आहे. आजही उपोषणकर्त्यांंनी निर्भयाला न्याय मिळाला पाहिजे, मराठा समाजावरील अन्याय दूर करा, आरक्षण मिळाले पाहिजे अशा मागण्या केली. आंदाेलकांची कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.

आमदार रोहित पवार म्हणाले मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न खरंच सोडवायचा असेल तर महाराष्ट्र सरकारने विशेष अधिवेशन बोलवून केंद्र सरकारला मराठा आरक्षणाबाबतचा ठराव पाठवून द्यावा.

केंद्र सरकारने बोलवलेल्या विशेष अधिवेशनामध्ये हा ठराव मंजूर झाल्यानंतर तो कायदा होऊन आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो. कुणबी समाजाचे दाखले देण्याबाबतचा निर्णय हा फक्त काही ठराविक लोकांच्या बाबतीत असलेला प्रश्न सोडवू शकतो असेही पवार यांनी नमूद केले. परंतु इतर लोकांचा प्रश्न तसाच प्रलंबित राहील, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसू नये असा टोलाही आमदार पवार यांनी यावेळी लगावला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pimpri Chinchwad Police : फिल्मी स्टाईलने १५ किमी पाठलाग; सराईत चोरटा ताब्यात, साडेसहा लाखांचा ऐवज हस्तगत

Pune Police : भर दिवसा दरोडा टाकला, पुणे पोलिसांनी सिने स्टाईल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या

Maharashtra Live News Update: विरार - दादर लोकल ट्रेनमध्ये माथेफिरूचा धुमाकूळ; रेल्वे प्रवासी महिलांची सुरक्षा वाऱ्यावर

IND vs PAK : पाकिस्तानविरोधात खेळावं की नाही, टीम इंडिया संभ्रमात, गौतम गंभीर म्हणाला...

Beed : जामीनावर सुटताच स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी; बीड शहरातील धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT