Thane Water Supply News : ठाण्यातील काही भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद, कुठे आणि कधी? वाचा

नागरिकांनी याची दखल घेऊन ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.
Thane, Water Supply
Thane, Water SupplySaam TV

Thane News : ठाणे शहरातील काही भागात येत्या शुक्रवारी (ता. 8) पाणी पूरवठा हाेणार नसल्याची माहिती महापालिकेने कळविली आहे. यामुळे नागरिकांनी पाणी काटकसरीने वापरणे आवश्यक बनले आहे. (Maharashtra News)

Thane, Water Supply
Bharat Or India? संभाजीराजे दिल्लीत दाखल, इंडिया शब्द बदलून भारत करणार असाल तर... (पाहा व्हिडिओ)

ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेचा व मे. स्टेम प्राधिकरणाकडून शुक्रवार (ता. 8) सकाळी नऊ वाजल्यापासून ते शनिवार (ता. 9) सकाळी नऊ वाजेपर्यंत 24 तासांचा शटडाऊन घेऊन निगा देखभाल व दुरूस्तीमधील अत्यावश्यक व तातडीची कामे करुन घेण्यात येणार आहे.

Thane, Water Supply
Sachin Tendulkar यांच्या घरासमाेर Bacchu Kadu यांचे आंदाेलन; भान ठेवून वागा ! नितेश राणेंनी काेणाला दिला सल्ला

या शटडाऊन कालावधीत ठाणे शहरातील घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतूपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याच्या काही भागातील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद (parts of thane to face 24 hr water cut on 8 september) राहणार आहे.

दरम्यान नागरिकांनी याची दखल घेऊन ठाणे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com