Pune Municipal Election Saam tv
मुंबई/पुणे

आर्चीसारखी दिसणारी उमेदवार कोण? संपूर्ण पुण्यात जोरदार चर्चा

Pune Municipal Election : आर्चीसारखी दिसणारी उमेदवार पुणे महापालिकेच्या निवडणुकीत उतरली आहे. या उमेदवाराची सर्वत्र चर्चा होत आहे.

Vishal Gangurde

आर्ची सारख्या दिसणाऱ्या उमेदवाराने अर्ज भरला

अंजली ओरसेने असे उमेदवाराचे नाव

अंजली ओरसे हिने राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरला

सागर आव्हाड, साम टीव्ही

पुण्यातील प्रभाग क्रमांक सात मधून 24 वर्षीय अंजली ओरसेने राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वात कमी वयाची उमेदवार म्हणून तिच्याकडे पाहिले जातं. वडिलांच्या उपस्थितीत व कार्यकर्त्यांचे उपस्थितीत तिने आज उमेदवारी अर्ज दाखल केला. गोखले नगरची कन्या म्हणून तिची ओळख आहे.

भाजपने विकास काम केले नाही, त्याचा फटका आम्हाला बसला. विकास कामांसाठी आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरले असल्याचं अंजलीने सांगितलं. विनोद ओरसे हे माजी नगरसेवक असून त्यांची मुलगी ही आता राजकारणात उतरली आहे.

आर्ची सारखी दिसणारी अंजली प्रभागामध्ये जाऊन विकास कामांचा आढावा आणि समस्यांचा आढावा गेल्या चार वर्षापासून घेते. राष्ट्रवादीकडून तिने उमेदवारी दाखल केली आहे. भविष्यात तिला सैराट सारखा प्रचार करावा लागणार आहे. तेव्हा मतदार तिला झिंगाट सारखं मतदान करतील.

भाजप विरोधात लोकांमध्ये मोठा रोष आहे विकास कामे केले नाहीत त्यामुळे त्याचा फायदा मला नक्कीच होईल असा विश्वास तिने व्यक्त केला. या निवडणुकीत अंजलीला कसा प्रतिसाद मिळतोय, याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

अंजली ओरसे कोण आहे?

अंजली ओरसे ही पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीतील २४ वर्षीय सर्वात कमी वयाच्या उमेदवार आहे

अंजली ओरसे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवतेय?

अंजली ओरसे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पुण्यातील प्रभाग क्रमांक ७ मधून निवडणूक लढवत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आज कार्यकर्ता रस्त्यावर आला, उद्या मतदार येईल? राजकारण्यांना पुढचा सावध इशारा | VIDEO

BMC Elections: भाजपकडून अभिनेत्रीला तिकीट मिळताच युतीत बिनसलं; शिंदे गटाच्या नेत्याची बंडखोरी

Wednesday Horoscope : नवीन वर्षांत मालामाल व्हाल; ५ राशींच्या लोकांचा संपत्तीचा मार्ग मोकळा होणार

4 टर्म भाजप नगरसेवक,यंदा तिकीट कापलं; ऐनवेळी ठाकरे गटाकडून उमेदवारी, अकोल्यात नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: कोरेगाव भिमा शोर्यदिन सोहळ्यात बिबट्याची दहशत कायम

SCROLL FOR NEXT