Maval Vadgaon Crime News  saam tv
मुंबई/पुणे

Crime News : सदिच्छा साने मृत्यू प्रकरणी धक्कादायक माहिती उघडकीस; फ्लोट ट्यूबवर सापडलेल्या रक्ताचे डाग दुसऱ्याच स्त्रीचे?

फ्लोट ट्यूबवर मिळालेलं रक्त सदिच्छाच नसल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

Ruchika Jadhav

Sadicha Sane case: एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या सदिच्छा सानेच्या मृत्यूने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. साल २०२१ मध्ये कॉलेजला जाते असं सांगून निघालेल्या सदिच्छाचा मृत्यू झाल्याची माहिती तब्बल २ वर्षांनी समजली. या प्रकरणी आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. फ्लोट ट्यूबवर मिळालेलं रक्त सदिच्छाचं नसल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून मिळाली आहे. (Crime News)

सदिच्छा साने हत्या प्रकरणी गुन्हे शाखेला मोठा धक्का बसला आहे. या प्रकरणी लाइफगार्ड मिट्टू सिंग आणि आणखी एका व्यक्तीला गेल्या महिन्यात मुंबई पोलीसांनी अटक केली होती. मिट्टू सिंग याने बँडस्टँडवर सदिच्छा सानेची हत्या केली. तसेच नंतर त्यांनी फ्लोटिंग ट्यूबच्या सहाय्याने मृतदेह समुद्रात टाकला, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता.

ज्या फ्लोटिंग ट्यूबचा वापर करण्यात आला होता ती ट्यूब देखील पोलीसांच्या हाती लागली. तसेच यावर रक्ताचे काही गाड आढळून आले. त्यामुळे हे रक्त सदिच्छाचं असल्याचा संशय पलिसांनी व्यक्त केला होता.

पुढील तपासासाठी पोलिसांनी सदिच्छाच्या आई वडिलांना त्यांच्या रक्ताचे नमुने मागवले होते. फ्लोटिंग ट्यूबवरील रक्त आणि सदिच्छाच्या आई वडिलांच्या रक्ताचे नमुने जुळवून पाहिले असता त्याचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.

फ्लोट ट्यूबवरील रक्ताचे नमुने एका महिलेचे आहेत पण ते सदिच्छाचे नाहीत असा FSL चा अहवाल समोर आला आहे. २९ नोव्हेंबर २०२१ ला बँड स्टँड वरून सदिच्छा अचानक बेपत्ता झाली होती. ती MMBS ची विद्यार्थीनी होती. सदिच्छाच्या मृत्यू प्रतकरणी डीएनए रिपोर्टमुळे आता या प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या घरावर दरोडा, जळगावच्या घरातून सोनं, रोकड लंपास

IND VS AUS: एकमेव 'या' भारतीय फलंदाजाने टी-२० क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाला धुतलं, ठोकलं दमदार शतक

Maharashtra Flood: अतिवृष्टीग्रस्तांना आतापर्यंत 8 हजार कोटींची मदत, पुढच्या 15 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 11 हजार कोटी

Narayan Rane : ...म्हणून मी शिवसेना सोडली; भाजप खासदार नारायण राणेंनी सांगितलं कारण

Wednesday Horoscope : संकटातून यशस्वीपणे मार्ग काढाल; ५ राशींच्या लोकांचा गोल्डन टाईम सुरू होणार

SCROLL FOR NEXT