Uttar Pradesh : उत्तर प्रदेश येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या एका तरुणाने आपल्या पत्नी आणि लहान मुलीची कुऱ्हाडीने वार करत हत्या केली आहे. संपूर्ण कुटुंब संपवल्यानंतर या तरुणाने स्वत:देखील गळफास घेत जीवन संपवलं आहे. या घटनेमुळे गावात सर्वत्र एकच खळबळ पसरली आहे. (Competitive Examination)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहनकुमार (वय) ३५ असं तरुणाच नाव असून पत्नी सीमा (वय ३०) आणि त्यांची चार महिन्यांच्या मुलगी हे तिघे वेगळ्या घरात राहत होते. रविवारी त्याचं आणि त्याच्या पत्नीचं जोरदार भांडण झालं होतं. यावेळी दोघांमध्ये मोठी बाचाबाची झाली. पत्नीचा राग आल्याने त्याने थेट तिच्यावर कुऱ्हाडीने घाव घातले यातच तिचा मृत्यू झाला.
त्यानंतर त्याने आपल्या पोटच्या मुलीला देखील सोडलं नाही. मुलीवर देखील त्याने कुऱ्हाडीने वार केले. यामध्ये चिमुकलीचा देखील मृत्यू झाला. आपल्या हातून घडलेल्या घटनेचं गांभीर्य समजल्यावर त्याने देखील जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. ज्या खोलीत त्याने पत्नी आणि मुलीची हत्या केली त्याच खोलीत त्याने स्वत:ला देखील गळफास घेतला.
ही घटना घडली त्या गावात जगन्नाथेश्वर मंदिरात भागवत कथेचा सप्ताह सुरु होता. त्यामुळे सर्व जण मंदिरात पोहचले होते. यावेळी मोहनकुमारच्या शेजारी राहणाऱ्या घरतील एक मुलगा घरीच थांबला होता. मोहनकुमारच्या घरात मोठमोठ्याने आवाज येत होता. तसेच नंतर हा आवाज अगदीच बंद झाला आणि घरात भयंकर शांतता पसरली. त्यामुळे काहीतरी चुकीचं घडल्याचा संशय त्या मुलाला आला. मंदिरातून घरातील इतर मंडळी परतल्यावर त्याने आपल्या बाबांना याची माहिती दिली.
यावेळी त्या मुलाच्या बाबांनी तपासले असता घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहचल्यावर वरच्या मजल्यावरील खिडकी तोडून ते आत आले. त्यावेळी त्यांनी पाहिले की, लहान मुलगी आणि पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. तसेच तरुणाने स्वत:ला गळफास लावून घेतला होता. हे दृष्य पाहून गावात सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली.
मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण गेल्या काही दिवसांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. यसह तो नोकरीच्या देखील शोधात होता. मात्र त्याला नोकरी मिळत नव्हती त्यामुळे तो नैराश्यात देखील होता. दोन वर्षांपूर्वीच त्याचं लग्न झालं होतं. अशात कुटुंबातील वाद वाढत असल्याने त्याने हे टोकाचं पाऊल उचललं.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.