Sachin Vaze And Anil Deshmukh  Saam Tv
मुंबई/पुणे

अनिल देशमुखांचा पाय खोलात? भ्रष्टाचार प्रकरणात सचिन वाझे माफिचा साक्षीदार होणार

सीबीआयने त्याच्या अर्जाला अटींसह होकार दिला आहे.

वृत्तसंस्था

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) याने कथित भ्रष्टाचार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Ex-Home Minister Anil Deshmukh) यांच्यासह अन्य आरोपींविरुद्ध माफिचा साक्षीदार होण्यासाठी विशेष CBI न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. सीबीआयने त्याच्या अर्जाला अटींसह होकार दिला आहे. आणि यावर ३० मे रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख सध्या कोठडीत आहेत. १०० कोटी वसुली प्रकरणात मागच्या अनेक दिवसांपासून अनिल देशमुख जेलमध्ये आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहून या प्रकरणाची उकल केली होती. मनसुख हिरेन हत्या प्रकरणात याअगोदर सचिन वाझेचा हात असल्याचे याअगोदर रिपोर्टमधून समोर आले आहे. आता सोमवारी सचिन वाझेची सीबीआय कोर्टासमोर साक्ष होणार आहे. सचिन वाझे काय बोलतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्या दोन मोठे नेते तुरुंगात आहेत. एक म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक. त्याचबरोबर शिवसेनेच्या अनेक लोकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. अनिल परब, अर्जुन खोतकर, यशवंत जाधव, आनंदराव अडसूळ, भावना गवळी हे शिवसेना नेते ईडीच्या रडारवर आहेत. राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून सतत आरोप करण्यात येत आहेत की केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : माहिम विधानसभेवर मनसेचा झेंडा फडकणार, विद्यार्थी संघटनेचा विश्वास

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT