sachin tendulkar  saam tv
मुंबई/पुणे

Sachin Tendulkar Latest News: ‘स्वच्छ मुख अभियाना’चा सचिन तेंडुलकर होणार स्माइल ॲम्बेसेडर, गिरीष महाजन यांची माहिती

‘स्वच्छ मुख अभियाना’चा सचिन तेंडुलकर होणार स्माइल ॲम्बेसेडर, गिरीष महाजन यांची माहिती

Satish Kengar

Sachin Tendulkar to be ambassador of Swachh Mukh Abhiyaan: प्रसिद्ध क्रिकेटपटू, भारतरत्न सचिन तेंडुलकर आता राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) होणार आहेत. राज्य शासनाच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून लोकांमध्ये जनजागृतीची महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यास तेंडुलकर याने सहमती दर्शवली असून उद्या त्याच्यासोबत याबाबतचा सामंजस्य करार करण्यात येणार असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी दिली.

सचिन तेंडुलकर यानी या अभियानाचे ‘स्माइल ॲम्बेसेडर’ म्हणून पुढील पाच वर्षे नियुक्त राहण्याची सहमती दर्शवली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सचिन तेंडुलकर आणि वैद्यकिय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्यामध्ये ‘स्वच्छ मुख अभियाना’साठी उद्या म्हणजेच ३० मे २०२३ रोजी सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रम होईल.

सचिन तेंडुलकर यानी या अभियानाचे सदिच्छादूत पद स्वीकारल्यामुळे या अभियानाची सर्वदूर व्याप्ती पसरुन चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही मंत्री महाजन यांनी व्यक्त केला. (Latest Marathi News)

राज्यात वाढत्या मौखिक आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत शिफारस करण्यात आलेल्या आणि जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केलेल्या मौखिक आरोग्याबाबत कृती योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने या वर्षापासून ‘महाराष्ट्र मौखिक आरोग्य अभियान‘ म्हणजेच ‘स्वच्छ मुख अभियान‘ राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य शासनाच्या वतीने हे अभियान जानेवारी २०२३ पासून सुरू करण्यात आले आहे. कॅलेंडर, कॅम्प आणि कॅम्पेन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजात मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अभियान राबवले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ramayana Collection : रणबीर कपूर-यशच्या 'रामायण'ची जगभरात धूम! १,११० कोटींची कमाई करत मोडले अनेक रेकॉर्ड

Shocking : मोठी बातमी! भाजप नेत्याच्या धावत्या कारला भीषण आग; दोघांनी कारमधून उडी मारली अन्...

Maharashtra News Live Update: ऐन दुष्काळी परिस्थितीत अमरावतीत नगरपरिषदेच्या इमारतीच्या छतावर ओली पार्टी रंगली

IAS Officer Transfer: मोठी बातमी! 38 आयएएस अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री तडकाफडकी बदल्या, प्रशासनात खळबळ

Maharashtra Weather: चक्रीवादळाचं संकट? राज्यात सकाळी थंडी, दुपारी उन्हाचा चटका; वाचा हवामान खात्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT