HoneyBee Viral News: 'या' देशात मधमाशांचे होत आहे अपहरण! 12 वर्षात 10 लाख माशा गायब, कारण जाणून व्हाल थक्क!

Honey bee Viral News: 'या' देशात मधमाशांचे होत आहे अपहरण! 12 वर्षात 10 लाख माशा गायब, कारण जाणून व्हाल थक्क!
Honey bee Viral News
Honey bee Viral NewsSaam Tv
Published On

Honey bee Viral News: आजपर्यंत तुम्ही लोकांचे अपहरण झाल्याचे ऐकले असेलच. कधी परस्पर वैमनस्यातून तर कधी मानवी तस्करीसाठी एखाद्या व्यक्तीचे अपहरण होत असल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

यामध्ये लहान मुलांच्या अपहरणाची प्रकरणे देखील समोर येतात. मात्र ब्रिटनमधून एक आगळीवेगळी बातमी समोर येत आहे. येथे चक्क मधमाशांचे अपहरण केले जात असल्याच्या घटना घडत आहेत.

Honey bee Viral News
Sakal-Saam Mahasurvekshan: महाराष्ट्रात काँग्रेसचे स्थान बळकट होतंय का? राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली? जाणून घ्या

होय, तुम्ही जे वाचलं आहे, ते बरोबर आहे. या देशात मधमाशांचे अपहरण होत आहे. 2011 पासून येथे 10 लाखांहून अधिक मधमाशांचे अपहरण झाले आहे. तसेच सुमारे 135 मधमाश्यांचे पोळे चोरीला गेले आहेत.

या अपहारांमुळे वर्षानुवर्षे मधमाशी पालन करणाऱ्या अशा अनेक शेतकऱ्यांना आपला व्यवसाय बंद करावा लागत आहे. मधमाश्या गायब झाल्यामुळे मध तयार होत नसल्याने शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे.  (Latest Marathi News)

Honey bee Viral News
Bride Chewing Gutkha Viral Video: बोलो जुबां केसरी! गुटखा खाण्याची तलब आवरेना; नवरीने वरातीतच...

अनेक शेतकऱ्यांनी व्यवसाय केला बंद

मधमाश्यांच्या अपहरणामुळे अनेकांना मधाचा व्यवसाय बंद करावा लागला. स्किडब्रुक, लिंक्स येथे राहणारे 60 वर्षीय गाए विल्यम्स यांनी सांगितले की, गेल्या वीस वर्षांत त्यांच्या अनेक मधमाशांचे अपहरण करण्यात आले. राणी मधमाशी गायब होताच बाकीच्या मधमाश्याही नाहीशा होतात.

ते म्हणाले की, हे अपहरणकर्ते अतिशय हुशार आहेत. मध उत्पादन फक्त मधमाशांच्या मदतीनेच होऊ शकते, हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे ते मधमाशांचे अपहरण करत आहेत. आतापर्यंत या अपहरणकर्त्यांचा शोध पोलिसांना लावता आलेला नाही. मात्र अनेक वर्षांपासून तपास सुरू आहे. (Viral Video

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com