Devendra Fadnavis Meet Raj Thackeray: देवेंद्र फडणवीस अचानक राज ठाकरेंच्या भेटीला, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Maharashtra Politics : या भेटीमागचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे. परंतू या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
Devendra Fadnavis Meet Raj Thackeray
Devendra Fadnavis Meet Raj Thackeraysaam tv
Published On: 

Devendra Fadnavis suddenly met Raj Thackeray : राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पडद्यामागे हालचाली सुरुच आहे. फडणवीस यांनी आज अचानक राज ठाकरेंची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांच्या निवसस्थानी जाऊन देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंना भेटले आहे. या भेटीमागचं कारण मात्र गुलदस्त्यात आहे. परंतू, या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. तसेच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक देखील सर्व राजकीय पक्षांच्या डोळ्यासमोर आहे. या निवडणुकांसाठी भाजप-शिवसेना युती आणि महाविकासआघाडीकडून जोरदार तयारी सुरू आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आज अचानक राज ठाकरेंची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. फडणवीस अचानक राज ठाकेरंना भेटल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

Devendra Fadnavis Meet Raj Thackeray
Sakal-Saam Mahasurvekshan: महाराष्ट्रात काँग्रेसचे स्थान बळकट होतंय का? राहुल गांधी यांची लोकप्रियता वाढली? जाणून घ्या

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भारतीय जनता पक्ष सावध झाला आहे. कोणत्याही परिस्थिती राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त जागा मिळवण्याची तयारी भाजपने सुरू केली आहे. राज्यातील सर्व 48 मतदारसंघात भाजपने बुथ प्लानिंग सुरू केले आहे. (Latest Marathi News)

Devendra Fadnavis Meet Raj Thackeray
Sakal-Saam Mahasurvekshan: मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण! पंतप्रधानांच्या कामगिरीबाबत लोकांना काय वाटतं?

कर्नाटकच्या निकालानंतर राज ठाकरेंनी भाजपला पराभव स्विकारण्याचा आणि आत्मपरिक्षण करण्याचा सल्ला दिला होता. तसेच भाजपने चुका सुधाल्या नाहीत तर त्यांचीही गत काँग्रेससारखी होऊ शकते असे देखील राज ठाकरें त्यांच्या भाषणात म्हणाले होते. राज ठाकरेंच्या अशा या टीकेनंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांची घेतलेल्या भेटीचा नेमका अर्थ काय याबाबत सध्यातरी तर्कवितर्क लावले जात आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.