Sachin Sawant Saam Tv
मुंबई/पुणे

Sachin Sawant On Bandatatya Karadkar: वारकरी संप्रदायात काही संघ भक्त परायण घुसले, जे ह.भ.प. म्हणवून घेतात - सचिन सावंत

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत समाजात विष पसरविण्याचा यांचा डाव आहे, असं म्हटलं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याच्या निर्णयावर कीर्तनकार बंडातात्या कराडकरांनी (Bandatatya Karadkar) टीका करताना वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यांनी राज्यातील महिला नेत्यांबाबद वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर राज्यात नवा वाद उद्भवला. याबाबत काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत समाजात विष पसरविण्याचा यांचा डाव आहे, असं म्हटलं (Sachin Sawant slams Bandatatya Karadkar about his statement).

सचिन सावंत यांचं ट्विट

टिळा टोपी घालुनी माळा। म्हणती आम्ही साधू॥ दयाधर्म चित्ती नाही। ते जाणावे भोंदू॥ वारकरी संप्रदायात काही संघ भक्त परायण घुसले आहेत. जे ह.भ.प. म्हणवून घेतात. कितीही दडवली तरी बोलण्यातून चड्डी दिसतेच. समाजात विष पसरविण्याचा यांचा डाव आहे. तुकाराम महाराजांनीच याबाबत सावध केले आहे, असं ट्विट सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी केलं.

बंडातात्या कराडकर यांना अटक नाही

बंडातात्या यांना अटक नाही. कोर्टाने हजर राहण्याचे आदेश दिल्यास हजर राहण्याची हमी दिलीये. महिला आयोगाची नोटीस अद्याप कराडकर यांना मिळालेली नाही, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली.

ह.भ.प बंडातात्या कराडकर (bandatatya karadkar) यांना आज सकाळी सातारा पोलिसांनी ताब्यात घेतलं होते. राज्यातील महिला नेत्या (leaders) मद्य प्राशन करतात असं वक्तव्य बंडातात्या कराडकरांनी केले होते. या आंदोलनात बंडातात्यांनी पोलिसांवर (police) देखील मास्कवरुन टीका केली होती. गुरुवारी रात्री उशिरा बंडातात्या कराडकरांवर गुन्हा दाखल झाला होता.

बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये होते. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांसोबत चर्चा झाली. अटक करण्याची गरज नाही, अशी पोलिसांची भूमिका होती. कराडकर पोलिसांना सहकार्य करत आहेत, अशी माहिती आहे.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT