Maharashtra Politics Uddhav thackeray Saamana Editorial Criticism CM Eknath Shinde  Saam TV
मुंबई/पुणे

Saamana Editorial : जनतेने अहंकाराचा कोथळा काढण्यासाठी 'वाघनखे' चढवली आहेत; 'सामना'तून शिंदे सरकारवर घणाघात

Maharashtra Political News : शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामनातून दसऱ्यानिमित्त शिंदे गटावर सडकून टीका करण्यात आली आहे.

प्रविण वाकचौरे

Mumbai News :

शिवसेना पक्ष फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांचे दुसरे दसरा मेळावे आज पार पडणार आहे. ठाकरे गटाचा शिवतीर्थावर तर शिंदे गटाचा आझाद मैदानावर दसरा मेळावा पार पडणार आहे. दोन्ही गटाचे गर्दी खेचून आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. दसरा मेळाव्यावरून दोन्ही गट एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मुखपत्र सामनातून दसऱ्यानिमित्त शिंदे गटावर सडकून टीका करण्यात आली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकार शिवरायांच्या महाराष्ट्रावर मोदी-शहांनी लादले. घटनाबाह्य , अहंकारी रावणाचा नाश होईल या जिद्दीने मराठी जनतेची मने व मनगटे तापली आहेत. शिवतीर्थावर 'राम-लीला' साजरी होईल . अहंकारी रावणाचे दहन होईल, महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होईल व भारत देश सूडाच्या फासातून मुक्त होईल. महाराष्ट्राच्या जनतेने अहंकाराचा कोथळा काढण्यासाठी ' वाघनखे ' चढवली आहेत, अशी टीका सामनातून करण्यात आली आहे.   (Latest Marathi News)

रावणाकडे सोन्याच्या विटा म्हणजे सोन्याचे खोके होते. ते खोकेही त्याला वाचवू शकले नाहीत हेच खरे दसऱ्याचे महत्त्व आहे. आज महाराष्ट्रात दसरा साजरा होत असताना राज्याची स्थिती काय आहे? श्रीराम नाशकातील पंचवटीत वास्तव्यास होते. रामस्पर्शाने ती भूमी पवित्र झाली, पण त्या पंचवटीत आज राजकीय आशीर्वादाने 'ड्रग्ज' म्हणजे अमली पदार्थांचा मोठा व्यापार चालतो. शेकडो कोटींचे अमली पदार्थ जप्त झाले. हे अमली पदार्थ रामाच्या पंचवटीत आले कोठून?, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.

एकीकडे श्रीरामाचा गजर करा सांगायचे आणि दुसरीकडे बीअरचे 'सरकारी प्रमोशन' करायचे. श्रीरामाचा गजर करा हे सांगणाऱ्यांच्या राज्यात हा असा नशेचा बाजार सुरू आहे. महाराष्ट्रातील तरुणांची निराशा वाढत आहे. त्यांना रोजगार नाही. रोजगार नाही म्हणून मग नशा व त्यातून आत्महत्या. मराठा, धनगर समाजाची 'आरक्षण' आंदोलने त्याच वैफल्यातून खदखदत आहेत. महाराष्ट्र कधी नव्हे इतका जातीपातीत फाटला आहे, असा घणाघात सामनातून करण्यात आले आहे.

महाराष्ट्राचे शौर्य, मर्दानगी, स्वाभिमान मारून शिवरायांच्या महाराष्ट्रास 'लाचार' बनवायचे हे धोरण अमलात आणले आहे. आता म्हणे, छत्रपती शिवरायांची 'वाघनखे' तीन वर्षांच्या कंत्राटावर, भाडेतत्त्वावर इंग्लंड येथून आणली जात आहेत.

इतिहासकार व शिवरायांच्या वंशजांच्या मनात या 'वाघनखां'विषयी शंका आहेत, पण काही कोटी रुपये जनतेच्या तिजोरीतून खर्च करून ही वाघनखे आणली जात आहेत. रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अशी शिवरायांची आज्ञा होती, पण येथे वाघनखांवर शिवरायांच्या नावाने कोटय़वधी रुपये लंडनमधील एका म्युझियमला दिले. शिवरायांच्या नावाने केलेला हा घोटाळा आहे, अशी टीका देखील सामनातून करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT