ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नेल आर्ट म्हणजे नखांवर वेगवेगळ्या रंगांद्वारे व डिझाइन्सद्वारे सजावट केली जाते. यामुळे हातांना आणि नखांना सुंदर आणि आकर्षक लूक येतो. नखांवर आर्टिफिशियल नखे लावली जातात.
फिकट गुलाबी किंवा न्यूड बेसवर पांढऱ्या टिप्स असलेला रेग लावला जातो. हि डिझाइन नखांवर केल्याने साधी आणि एलिगंट दिसते.
चमकदार ग्लिटर वापरून केलेला नेल आर्ट पार्टी, सण आणि न्यू ईयर सेलिब्रेशनसाठी खूप ट्रेंडिंग आहे.
फुलांचे डिझाइन असलेला हा नेल आर्ट सॉफ्ट लूक देतो. लग्नसमारंभासाठी फुलांचे डिझाइन मोठ्या प्रमाणात केले जाते.
ओम्ब्रे नेल म्हणजे दोन किंवा अधिक रंग सुंदररीत्या एकत्र करुन केलेला डिझाइन आहे. हा नेल आर्ट युनिक आणि स्टायलिश दिसतो.
या डिझाइनला चमक नसते पण मॅट फिनिश नेल आर्ट क्लासी आणि बोल्ड लूक देतो. साधेपणा आवडणाऱ्यांसाठी मॅट नेल आर्ट बेस्ट आहे.
3D नेल आर्ट म्हणजे स्टोन्स, मोती, चार्म्स वापरून केलेला आर्ट. हे नेल आर्ट खास कार्यक्रम आणि पार्टीसाठी परफेक्ट आहे.
रेषा, आकार आणि रंगांचे वेगळे कॉम्बिनेशन यात केले जाते. क्रिएटिव्ह आणि युनिक लूकसाठी अॅब्स्ट्रॅक्ट नेल आर्ट ओळखले जाते.
डॉट्स, सरळ रेषा किंवा सिंगल कलर डिझाइन. रोजच्या वापरासाठी साधा आणि सुंदर पर्याय आहे.