Ajit Pawar News saam tv
मुंबई/पुणे

Ajit Pawar: 'नव्या ‌राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा, त्यात तथ्य नाही'; अजित पवारांची साम टीव्हीला Exclusive माहिती

Latest News: अजित पवार भाजपसोबत जाणार या चर्चांमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Priya More

रुपाली बडवे, मुंबई

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (NCP leader Ajit Pawar) भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. या चर्चांमुळे राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशामध्ये अजित पवार यांनी या चर्चांवर साम टीव्हीला प्रतिक्रिया दिली आहे. 'नव्या ‌राजकीय समीकरणांच्या फक्त चर्चा, त्यात काहीच तथ्य नाही', असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

अजित पवार हे भाजपसोबत जाऊ शकतात अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या आहेत. या चर्चांदरम्यान अजित पवारांना 40 आमदारांनी पाठिंबा दिला असल्याची माहिती आज समोर आली. या 40 आमदारांनी सह्या देखील दिल्या असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने छापले. त्यामुळे अजित पवारांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चांना आणखी वेग आला.

याच दरम्यान, अजित पवार आज विधिमंडळातील आपल्या कार्यलयात दाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे एक एक आमदार अजित पवारांची भेट घेत आहेत. पण अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची अशा कोणत्याही प्रकारची बैठक बोलावली नसल्याचे राष्ट्रवादीच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे हे देखील मुंबईत दाखल झाले. त्यांचे दोन्ही फोन कालपासून नॉट रिचेबल होते. पण आता धनंजय मुंडे हे थेट विधानभवनात पोहचले.

अशामध्ये, अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलावली नसून आम्ही आमदारच एकत्र भेटणार आहोत, अशी माहिती राष्ट्रवादीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली. याचवेळी, अजितदादा जिथे जातील तिथे अण्णा बनसोडे त्यांच्यासोबत असेल, असेही अण्णा बनसोडे यांनी स्पष्ट केले. यासर्व वेगवान राजकीय घडामोडी पाहता नेमकं राज्यात चाललंय काय?, अजित पवार नक्की भाजपमध्ये जाणार काय?, नेमक्या काय घडामोडी घडणार? अशा प्रकारच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह! दारुच्या नशेत कारचालकाने डिलिव्हरी बॉयला उडवले, छातीवरून चाक गेले अन्...

Maharashtra Live News Update: मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी

Anurag Dwivedi Case: लॅम्बोर्गिनी ते थार...; युट्यूबरच्या घरी ईडीचा छापा, दुबईतील क्रूझवर लग्न केल्याने संशय वाढला

Green Chutney Potato Slices : हिरव्या चटणीचे झणझणीत आणि कुरकुरीत बटाट्याचे काप, एकदा करुनच बघा

New Year 2026 Horoscope: २०२६ हे वर्ष तुमच्यासाठी कसं असेल? वाचा संपूर्ण १२ राशींचं भविष्य

SCROLL FOR NEXT