SSC & HSC Board Exam Result : दहावी-बारावीचा निकाल कधी लागणार ? महत्त्वाची माहिती आली समोर

CBSE Result Site : परीक्षेचे निकाल CBSE बोर्डाच्या अधिकृत साईट results.cbse.nic.in आणि cbseresuts.nic.in वर प्रसिद्ध केले जातील.
SSC & HSC Board Exam Result
SSC & HSC Board Exam ResultSaam tv

CBSE Board Result : गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ बारावीचा निकाल वेळेआधीच लागण्याची शक्यता आहे. परीक्षेचे निकाल CBSE बोर्डाच्या अधिकृत साईट results.cbse.nic.in आणि cbseresuts.nic.in वर प्रसिद्ध केले जातील.

या अधिकृत वेबसाईट्सवर (Website) विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. निकाल तपासण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा रोल नंबर, जन्मतारीख आणि प्रवेशपत्र ओळखपत्र यांसारखे तपशील नोंद करावे लागतील.

SSC & HSC Board Exam Result
Short Term Courses After 10th: दहावीनंतर पुढे काय? 'या' पर्यायांचा करा विचार...

बारावीची (HSC) परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत पार पडली तर दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या दरम्यान पार पडली. बारावीच्या परीक्षेला राज्यातून १४ लाख ५७ हजार २९३ विद्यार्थ्यांची नोंदणी तर १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती.

कधी लागेल निकाल ?

सीबीएसईने अधिकृत वेबसाइटवर निकालाची तारीख (Date) आणि वेळ सध्या जाहीर केलेली नाही. परंतु, मिळालेल्या माहितीनुसार बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे तर दहावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागू शकतो. तसेच बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे तसेच मॉडरेशन चे काम काम अंतिम टप्प्यात आहे अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने माहिती दिली

SSC & HSC Board Exam Result
Digital Marketing Career : डिजिटल क्षेत्रात करिअरच्या नव्या संधी, हे कोर्स करा मिळेल लाखोंचा पगार

निकाल कसा पाहायचा?

निकाल पाहण्यासाठी CBSE च्या अधिकृत वेबसाईट results.cbse.nic.in आणि cbseresuts.nic.in वर पाहू शकतो. तसेच CBSE चे निकाल डिजिलॉकरवर देखील उपलब्ध असतील.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com