मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या परिषदेतील मेजवाणीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अंदाज समितीच्या परिषदेतील सदस्यांसाठी भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सदस्यांना चांदीच्या ताटात जेवण वाढण्यात आलं. यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. लाडक्या बहिणींसाठी पैसे नाहीत. पण सरकारी पाहुण्यांसाठी चांदीच्या थाळीचा वापर केला जात आहे, यावरून विरोधकांनी टीका केली.
अंदाज समितीच्या मेजवाणीवरून आमदार रोहित पवार यांनी 'एक्स'वर पोस्ट सरकारला निशाणा साधला आहे. 'राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीचं काम योग्य पद्धतीने सुरू आहे का, असा प्रश्न पडलाय. काही दिवसांपूर्वी धुळे जिल्ह्यात उडालेली ५ कोटी रुपयांची धूळ डोळ्यात जाऊन पाहुण्यांचे डोळे चुरचुरू नयेत. तसेच चांदीच्या ताटांचा लखलखाट पाहूनच त्यांचे डोळे दिपावेत (की विस्फरावेत?) यासाठी तर देशभरातील पाहुण्यांचा सरकारी पाहुणचार चांदीच्या ताटात केला नाही ना, अशी शंका येतेय'.
'एकीकडं लाडक्या बहिणींना देण्यासाठी पैसे नाहीत, त्यामुळे वेगवेगळ्या खात्यातून पैसे वर्ग केले जातात. दुसरीकडे चांदीच्या ताटांवर अशा प्रकारे उधळपट्टी केली जाते, हा सरकारचा कोणता अंदाज आहे? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
माजी मंत्री बच्चू कडू यांनीही सरकारवर टीका केली. 'एकीकडे सरकार दिव्यांगाचे पैसे सहा महिने देत नाही. एमआरजीएसमध्ये काम करणाऱ्या मजुरांचे पैसे मिळत नाही. सरकार म्हणते की पैसे नाही. कर्जमाफी मागताना तिजोरी दाखवता, पण चार हजाराचं ताट आमदाराच्या समोर माडतांना बजेटचा आकडा दिसत नाही का? भुकेलेल्या माणसासमोर तावाने पुरणपोळी खाणारी प्रवृत्ती आहे. ही रावणाची ,अफजलखानाची प्रवृत्ती आहे, अशी टीका कडू यांनी केली आहे.
'एकीकडे महाराष्ट्र उपाशी आहे. तडफडू तडफडू शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. आमदार चांदीच्या ताटात 4000 खर्च करून जेवत असेल तर यातून तुम्हाला आम्हाला संदेश काय द्यायचा हा प्रश्न आहे. तुम्हाला धाडस,हिम्मत आली कशी? ईव्हीएममशीन मुळे आली का? जातीचा तीन-चार दिवसात धर्माची झेंडे दाखवले, जातीचं आव्हान केलं तर मत मिळतेच असे मूर्ख मतदार आहे म्हणून तुम्हाला काही हिम्मत आली का? मतदाराचं भय राहिलं नाही का, असा सवाल बच्चू कडू यांनी केला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.