Rohit Pawar ON Ajit Pawar Saam tv
मुंबई/पुणे

Maharashtra Politics : हरियाणात भाजपचे मित्रपक्ष 'शुन्यावर'; रोहित पवारांचा काकांना सावधतेचा इशारा, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Rohit pawar on Ajit pawar : हरियाणा निकालाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटताना दिसत आहेत. होऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत या निकालाची चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मात्र या निकालानंतर वेगळाच मुद्दा मांडला असून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना धोक्याचा इशारा दिला आहे.

Tanmay Tillu

मुंबई : राजकीय जाणकार आणि एग्झिट पोल्सना खोटं ठरवत हरियाणा निवडणुकीचे निकाल भाजपाच्या बाजूने लागले. भाजपाने 48 जागा जिंकत स्पष्ट बहुमत प्राप्त केलं. तर जे सत्तेचे दावेदार समजले जात होते, त्या काँग्रेसला 37 जागांवर समाधान मानावं लागलंय.. या निकालाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटताना दिसतायत.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर या निकालाची चर्चा आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मात्र या निकालानंतर वेगळाच मुद्दा मांडला असून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना धोक्याचा इशारा दिला आहे.

भाजपा ज्यांच्याबरोबर आघाडी किंवा युती करतो, कालांतराने त्यांनाच संपवतो, असा एक आरोप विरोधक करत असतात. योगायोगाने हरियाणा विधानसभेच्या यंदाच्या निवडणुकीत असेच काहीसे चित्र दिसले.

भाजपचे मित्रपक्ष 'शुन्यावर'

2019 साली हरियाणात भाजपाला 40 जागा

बहुमतासाठी 10 जागा असलेल्या जननायक जनता पक्षाशी युती

2024 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी युती तुटली

2024 च्या निवडणुकीत जेजेपीला शून्य जागा

उपमुख्यमंत्री असलेले जेजेपीचे सर्वेसर्वा दुष्यंत चौटालाही पराभूत

2019 मध्ये चौटालांना 92 हजार 504 मतं, यंदा अवघी 7 हजार,950 मतं

भाजपनं यावर्षीच मार्च महिन्यात जेजेपीशी युती तोडत मनोहरलाल खट्टर यांना बाजूला करून नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्रीपदावर बसवलं होतं. त्यामुळे राज्यात आगामी विधानसभेच्या दृष्टीनं रोहित पवारांनी केलेलं भाष्य सूचक ठरलंय..त्यातून अजित पवार आणि एकनाथ शिंदे काय बोध घेणार आणि राज्यातही भाजपचा हरियाणा पॅटर्न पाहायला मिळणार का हेच पाहायचं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: वर्सोवा बीच परिसरात महिलेला धमकी; आरोपीकडून गावठी पिस्तूल जप्त

Ethiopia Volcano: ज्वालामुखीत भस्म होणार जग? ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भारतावर संकट?

Shocking: तिकीट तपासताना वाद, टीसीने धावत्या ट्रेनमधून ढकललं; नेव्ही अधिकाऱ्याच्या बायकोचा मृत्यू

Local Body Election: उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Maharashtra Politics: राजकरणात हादरा! 2 डिसेंबरनंतर महायुती तुटणार?

SCROLL FOR NEXT